चाळीस वर्षांच्या गृहिणी असलेल्या अनुयाने गेल्या दहा वर्षांत १२ वेळा घर बदलले. अनुया घराबाहेर पडली की तिचे शेजारी एकमेकांना इशारे करून तिची खिल्ली उडवायचे. सतत तिच्या स्वयंपाकाची चर्चा करायचे, तिला नावे ठेवायचे. एवढेच नव्हे, तर तिचे कित्येक दिवसांत पतीशी लैंगिक संपर्क नाही, हेसुद्धा त्यांना कळले. कसे बरे? कारण त्यांनी बहुतेक घरांत कॅमेरे लावून ठेवले असावेत, असे तिला वाटत होते. आता पुन्हा घर बदलायचे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भ्रम आणि वागणूक
आपल्या पंचेंद्रियांमधून आजूबाजूची माहिती मिळत असते. मात्र काही व्यक्तींना इंद्रियांमध्ये चुकीच्या संवेदना होतात. आवाज ऐकू येणे, कुणी तरी दिसणे, वास येणे, स्पर्श जाणवणे, चव लागणे हे या संवेदनांचे काही प्रकार असतात. वारंवार असे घडल्याने त्या माणसाला हे सर्व खरे वाटू लागते.
काही वेळेला एकाएकी माणसाला भ्रम निर्माण होतो. मग प्रत्येक गोष्ट त्या नजरेने बघितली जाते. आपला जोडीदार एकनिष्ठ नाही, हा भ्रम खूपच भयानक असतो. ती व्यक्ती सतत जोडीदाराशी भांडते, त्याचे सामान/ कपडे तपासून पाहते, कधीकधी हे मारहाण आणि खून करण्याचे कारणदेखील ठरते. याच्या विरुद्ध म्हणजे एखाद्या व्यक्तीचे आपल्यावर जिवापाड प्रेम आहे, असाही भ्रम काहींना होतो. डॉक्टर, शिक्षक, सिनेमातील अभिनेते-अभिनेत्री अशा सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींविषयी असे वाटते. त्या व्यक्तीचा पाठलाग करणे, पत्र पाठवणे, भेट देणे सुरू होते. त्या व्यक्तीजवळ इतर कुणी गेलेले सहन न होत नाही.
काही व्यक्तींना आपल्या दिसण्यात किंवा शरीरात कमतरता वाटू लागते. अशा व्यक्ती काही विकृती नसताना भरमसाट पसा खर्च करून अवयव सुधारण्यामागे लागलेले असतात. त्यातील काही जणांना खात्री वाटते की, आपल्या शरीरात/त्वचेमध्ये किडा फिरत आहे, तो शोधून घालवण्यासाठी वेगवेगळे डॉक्टर-वैद्य केले जातात. काहींना इतर कुणी व्यक्ती किंवा संस्था मुद्दामहून त्रास देत आहे, असे वाटते. शेजारी, पोलीस, राजकारणी, पुढारी अशांवर संशय घेतले जातात.

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Misconception about health and body
First published on: 20-06-2015 at 08:41 IST