शरीराच्या नियमित वाढीसाठी आणि देखभालीसाठी जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. मात्र बहुतांश जीवनसत्त्व शरीरात तयार होत नसल्याने आहारातून ती घेणे गरजेचे ठरते. काही जीवनसत्त्व पाण्यात विरघळणारी असतात. त्यामुळे ती मूत्रावाटे शरीराबाहेर पडतात. त्यामुळे ती आहारातून दररोज घेणे आवश्यक ठरते. ‘ब’ जीवनसत्त्व (ब१, ब२, ब६ आणि ब१२) आणि ‘क’ जीवनसत्त्व पाण्यात विरघळतात. ‘अ’, ‘ड’, ‘ई’ आणि ‘के’ जीवनसत्त्व मात्र पाण्यात विरघळणारी नाहीत.

खनिजे –  शरिरातील केवळ चार ते पाच टक्के भाग हा खनिजांचा बनलेला असला तरी स्वास्थ्यासाठी ती अत्यावश्यक ठरतात. पाणी तसेच आहारातून खनिजे मिळू शकतात. खनिजेदेखील शरीरात तयार होत नसल्याने आहारातून त्यांचा पुरवठा करणे आवश्यक ठरते.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?

शरीरातील कॅल्शिअमपकी केवळ एक टक्का कॅल्शिअम चयापचय क्रियेसाठी वापरले जाते तर उर्वरित ९९ टक्के हाडे आणि दात यांच्या मजबुतीसाठी आणि वाढीसाठी उपयोगात येते. शरीरात कॅल्शिअम मुबलक प्रमाणात आढळते. दूध, योगर्ट आणि चीजमध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शिअम असते.

हाडे, दात व चेतापेशी बनवण्यासाठी कॅल्शिअमसोबत फॉस्परसचा उपयोग होतो.

स्नायूंना बळकटी आणण्यासाठी, अ‍ॅसिडचा तोल सांभाळण्यासाठी तसेच हृदयातील इलेक्ट्रीक कार्य चालण्यासाठी पोटॅशिअमचा वापरले जाते. पोटॅशिअमची कमतरता असेल तर स्नायू कमकुवत बनतात, हृदयाच्या ठोक्यात अनियमितता आढळते आणि रक्तदाबही वाढलेला दिसतो.

लोह हा शरीरातील खनिजांपकी मुख्य घटक आहे. ऑक्सिजनच्या वहनाची भूमिका बजावणारे लोह पेशींच्या वाढीवरही नियंत्रण ठेवतात.

शरिरातील एकूण लोहापकी दोन तृतीयांश भाग हिमोग्लोबिनमध्ये आढळतो.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगातील ४१.८ टक्के गर्भवती स्त्रिया अनिमिक असतात आणि त्याचे मुख्य कारण लोहाची कमतरता असते.

जीवनसत्त्व ‘अ’चे दोन प्रकार आहेत. मासे, अंडी, चिकन, मटण आणि दुग्धजन्य पदार्थात पहिल्या प्रकारचे जीवनसत्त्व असते तर फळे, भाज्या यांच्यात प्रोव्हिटामीन ‘अ’ असते.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, रक्ताच्या गुठळ्या होऊ न देता रक्तनलिका मोकळी ठेवण्यासाठी जीवनसत्त्व ‘ई’चा उपयोग होतो. वनस्पती तेल, टरफलयुक्त फळे आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये हे जीवनसत्त्व असते.

लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी, डीएनएच्या समन्वयासाठी आणि मज्जासंस्थेच्या योग्य कार्यासाठी जीवनसत्त्व ‘ब१२’ उपयोगी ठरते. या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाल्यास अशक्तपणा, बद्धकोष्ठता, अपचन आणि वजन कमी होण्यासारखे प्रकार घडतात. हात आणि पाय वळण्यामागेही हे कारण असू शकते. मासे, चिकन, दुग्धजन्य पदार्थ यांच्यामध्ये हे जीवनसत्त्व असते.

जीवनसत्त्व ‘ई’ व ‘क’ हे अण्टिऑक्सिडंटचे काम करतात. आंबट फळे (द्राक्ष, संत्री, लिंबू) यात जीवनसत्त्व ‘क’ असते.