‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’ हे शब्द आयुर्वेदाच्या संदर्भात नेहमी ऐकलेले असतात. पण हे नक्की काय असतं, त्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी काय संबंध, हे सर्वाना माहीत नसतं. वात, पित्त आणि कफ हे तीन ‘दोष’ समजले जातात. दोषाधिक्यानं बनलेल्या ‘प्रकृती’ला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. प्रकृती आणि आहार या तर अगदी जवळच्या गोष्टी. आपल्या खाण्याच्या आवडीनिवडी जशा प्रकृतीवर अवलंबून असतात, तसंच काय खावं आणि काय टाळावं यातही प्रकृती-प्रकृतीमध्ये फरक असतो. काही पथ्यं पाळली तर प्रकृती बिघडल्यामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करता येऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जन्माला येतानाच आपण ज्या प्रकारची प्रकृती घेऊन येतो, ती आयुष्यभर बदलत नाही. माणसाची शरीरयष्टी, शारीरिक गुण, स्वभाव, आवडीनिवडी हे सगळं प्रकृतीवर अवलंबून असतं, असं आयुर्वेद मानतो. अर्थात तुमची प्रकृती वर दिलेल्या तीनपैकीच एक असली पाहिजे, असं नाही. काही जणांच्या बाबतीत ते दोषांचं मिश्रणदेखील असू शकतं. या लेखात मात्र आपण वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांची आयुर्वेदात सांगितलेली ढोबळ लक्षणं पाहू या. त्या त्या प्रकृतीच्या व्यक्तींना होऊ शकणारे त्रास आणि या त्रासांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी काय खावं आणि काय टाळावं हेही पाहू. एखादा पदार्थ एखाद्या व्यक्तीला चालतो, पण तोच पदार्थ खाल्ल्याने दुसऱ्याला मात्र त्रास होऊ शकतो अशी ही संकल्पना आहे. हे सगळं जाणून घेणं उत्सुकता वाढवणारं असलं तरी आपली स्वत:ची प्रकृती कुठली हे आपल्या वैद्यांकडून तपासून जाणून घेतलेलं बरं. कारण त्यानुसार आपल्याला चालणारे आणि न चालणारे पदार्थ वेगळे असू शकतील.
पित्त प्रकृती
‘पित्त’ प्रकृतीच्या व्यक्तींच्या त्वचेचा रंग सहसा गोरा आणि शरीरयष्टी मध्यम असते. त्यांची जीभ, टाळू, हाताचे तळवे, ओठ लालसर वर्णाचे असतात. केस पिंगट रंगाचे असतात आणि ते लवकर पिकतात. त्यांच्या त्वचेला सुरकुत्याही लवकर पडतात. ही मंडळी बुद्धीनं चांगली तीक्ष्ण असल्याचं बघायला मिळतं. यांना राग लवकर येतो. वारंवार भूक लागते आणि यांच्या आहाराचं प्रमाणही अधिक असतं. पित्त बिघडलं तर त्वचेवर लाल पुरळ येणं, फोड किंवा पस होणं, हातापायांचा दाह होणं, चक्कर येणं, भरपूर तहान लागणं, जेवायला अगदी १५-२० मिनिटांचा उशीर झाला तरी गळून गेल्यासारखं वाटणं अशा तक्रारी उद्भवतात.

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain message on social media
First published on: 20-06-2015 at 08:44 IST