परीक्षा जवळ आल्याच्या विचाराने मनावर ताण येणे साहजिक आहे. केवळ परीक्षेचीच भीती नव्हे तर विशेषत: दहावी-बारावीनंतर आजूबाजूचे वातावरण बदलणार, मित्रमैत्रिणी बदलणार, रुटीन बदलणार हे विचारही अभ्यास करताना त्रास देतात. कोणताही बदल ‘टेन्शन’ देणारा ठरू शकतो. काही वेळा हे टेन्शन सुखदही असू शकते. तर काही वेळा ते सुखदु:खमिश्रित असते. जसजशी परीक्षा जवळ येऊ लागते. तसा भारंभार अभ्यासाचा ताण जाणवू लागतो. त्याबरोबरच केलेला अभ्यास आठवेल का, आपल्याला चांगले गुण मिळतील का, मुख्य म्हणजे हवा तिथे प्रवेश मिळेल का हे विचार मनात असतातच. हे सगळे विचार करताना मनाशी एक खूणगाठ मात्र पक्की बांधायला हवी. दहावी-बारावी जीवनातले महत्त्वाचे टप्पे असले, तरी ते शेवटचे नक्कीच नाहीत. त्यामुळे या काळात (आणि खरे म्हणजे नेहमीच) सकारात्मक मानसिकता ठेवणे आवश्यक आहे.
परीक्षेच्या ताणावर उपाय काय?
*अभ्यासाचे वेळापत्रक बनवा, वेळेचा अपव्यय टाळा
*ताण आल्यासारखे वाटेल तेव्हा खोल श्वास घ्या
*नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक बाजूला सारून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा
*रोज थोडा वेळ व्यायाम करा
*ताण घालवण्यासाठी थोडा वेळ विनोद किंवा गाणी ऐका
*बागेत फेरफटका मारून या
*मित्र-मैत्रिणींबरोबर थोडा वेळ गप्पा मागल्यानेही मनावरचा ताण कमी होईल. या गप्पांत एकमेकांशी तुलना नको.
पुढील लक्षणे परीक्षेचा ताण आल्याचे सुचवणारी असू शकतात
*थकवा आल्यासारखे वाटते
*अभ्यासात लक्ष लागत नाही
*सतत मनात नकारात्मक विचार येतात
*केलेला सगळा अभ्यास विसरल्यासारखा वाटतो
*परीक्षेत आपल्याला काहीच आठवणार नाही असे वाटते
*आपण नापास होऊ अशी सारखी चिंता वाटते
*डोके दुखते
*शांत झोप लागत नाही
*लोकांमध्ये मिसळण्यात रस उरत नाही
*एकटे राहावेसे वाटते
परीक्षेपूर्वीच्या अभ्यासाच्या काळात किंवा परीक्षा काळात हे शक्यतो टाळाच
*रात्री उशिरापर्यंत जागरण
*जागरणासाठी अतिरिक्त
चहा-कॉफीचे सेवन
*सामोसा, वडा असे तेलकट आणि मसालेदार पदार्थ
*पावासारखे बेकरीचे पदार्थ
*खूप वेळ टीव्ही पाहणे
*खूप मोठय़ा आवाजात गाणी ऐकणे
*मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर
गेम्स खेळणे
ताण का येतो ?
*पालक, शिक्षक, नातेवाईक, शेजारी अशा अनेकांच्या अपेक्षांचे ओझे
*‘पीअर ग्रुप प्रेशर’ म्हणजे समवयस्कांचा/ मित्रमैत्रिणींचा प्रभाव
*‘करिअर’चा ‘टर्निग पॉइंट’चे वर्ष असल्याची जाणीव
*आत्मविश्वासाची कमतरता
*न्यूनगंड बाळगणे
*सततची तुलना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tension of preparing examination
First published on: 21-12-2013 at 03:58 IST