एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मेंदूला पूर्णपणे ज्ञान होण्याकरिता आपल्या शरीरातील पंचेंद्रिये काम करीत असतात. वस्तूचा आकार, वस्तूमान, रंग याविषयीचे ज्ञान डोळ्यांमार्फत होते. काही मिनिटे डोळे बंद करून बसायचे म्हटले तरी आपल्याला सारे फार अवघड वाटू लागते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी प्रयत्न न करणे आणि बदलती जीवनशैली यामुळे लहान वयात चष्मा लागणे, लहान वयातच मोतिबिंदू होणे, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांच्या तक्रारींमुळे डोके दुखणे अशा तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्याही वाढते आहे. याच लहानशा पण अत्यंत नाजुक आणि महत्वाच्या अवयवाविषयी सांगताहेत डॉ. संजीवनी राजवाडे.
डोळा असतो तरी कसा?
*कॉर्निया- ही डोळ्याची समोरची खिडकी असते. त्यातून प्रकाश आतपर्यंत जाऊन केंद्रित होतो.
*आयरिस- हा डोळ्याच्या आतील रंगीत भाग होय. आपल्या डोळ्यांचा रंग या
  भागावरून ठरतो.
*लेन्स (भिंग)- डोळ्याच्या मागील पडद्यावर प्रकाश किरण एकत्रित करून
  पोहोचवण्याचे काम यामार्फत केले जाते.
*प्युपिल- रंगीत भागाच्या केंद्रस्थानास प्युपिल असे म्हणतात. प्रकाश किरणे
  किती प्रमाणात आत जावीत हे यावर अवलंबून असते. त्यानुसार याचा आकार कमी- अधिक होतो.
*रेटिना-  हा भाग म्हणजे डोळ्यांच्या पाठीमागच्या बाजूस असणारा पडदा
  आहे. यावर किरण एकत्रित होतात व तेथून नंतर त्याविषयीची माहिती मेंदूकडे
  पोहोचवली जाते. यामध्ये अनेक रक्तवाहिन्यांचे जाळे पसरलेले असते.  
*मॅक्यूला- हा अगदी लहानसा भाग किंवा ठिपका असतो. यात प्रकाशकिरणांचे ज्ञान होणाऱ्या पेशी असतात. या भागामुळे आपण कोणतीही प्रतिमा सुस्पष्ट पाहू  शकतो. हे डोळ्याचे प्रमुख भाग झाले. याव्यतिरिक्त डोळ्यांच्या पुढील भागात द्रवपदार्थ असतो आणि पाठीमागच्या पोकळीत जेलीसदृश पदार्थ असतो. आपल्या डोळ्यात असणारे भिंग मांसपेशींच्या बारीक तंतूंनी आतमध्ये बसवलेले असते. रेटिनाला जोडलेली ऑप्टिक नव्‍‌र्ह ही नस सर्व संदेश मेंदूपर्यंत पोहोचवते.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips for looking after your eyes
First published on: 14-12-2013 at 12:57 IST