07 April 2020

News Flash

अंध, मूक-बधिर, अपंगांसाठी

ही हेल्पलाइन केवळ व्हॉट्स अ‍ॅपवरच चालते

जन्मत: किंवा अपघातांनी आलेले अंधत्व, अपंगत्व यांचा स्वीकार करून स्वावलंबीपणे जगणाऱ्या अनेक व्यक्ती आपण समाजात पाहतो. त्यांना मदतीचा हात देऊ करणाऱ्या हेल्पलाइन्सची ही माहिती –

महाराष्ट्र पोलिसांची फक्त मूक-बधिरांसाठी एक हेल्पलाइन आहे. ही हेल्पलाइन केवळ व्हॉट्स अ‍ॅपवरच चालते. कारण मूक बधिर बोलू शकत नसले तरी बघू शकतात व मेसेजही करू शकतात. या हेल्पलाइनवर पोलिसांकडून हवी असलेली मदत मूक-बधिरांना मिळते. हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ९३२०२००१००.

अली यावर जंग नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर दी हिअिरग हँडीकॅप्ड, वांद्रे, मुंबई. हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २६४००२१५, ०२२ २६४००२२८, ०२२ २६४०९१७६, ०२२ २६४००४६३.

गांधी नर्सिग होम स्पीच अँड साउंड कंसेप्ट, मुंबई. हेल्पलाइन क्रमांक – ०२२ ३८५७५११२.

चाइल्डरेज ट्रस्ट, मुंबई. हेल्पलाइन क्रमांक – ०२२ ६१४२८०११.

मूक-बधिरांची भाषा शिकवणारी संस्था आहे – डेफ साइन लँग्वेज ट्रेनिंग सेंटर, मुंबई. या संस्थेच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ७७३ ८८८ ८८ ८८. या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यायचा. लगेचच त्या संस्थेकडून संपर्क साधला जातो व आवश्यक ती माहिती दिली जाते. हेलन केलर इंस्टिटय़ूट फॉर डेफ अँड ब्लाइंड, मुंबई या संस्थेच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २३०८७०५२. या संस्थेतर्फे मूक-बधिर आणि अंध मुलांना कमी खर्चात किंवा विनामूल्य शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यांच्या शिक्षणासाठी येणारा प्रवास, जेवण खर्च, वैद्यकीय सुविधा, श्रवणयंत्र, गणवेश, समुपदेशन खर्चही संस्थेतर्फे केला जातो.

अपंग, विकलांग व्यक्तींसाठी असलेल्या हेल्पलाइन्स – हेल्प हँडिकॅप्ड इंटरनॅशनल, मुंबई. हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २३८९८९३०, ०२२ २३८२१९०१. या संस्थेतर्फे अपंगांना व विकलांगांना जयपूर फूट, चाकांच्या खुच्र्या, कुबडय़ा आदी साहित्याची मदत केली जाते.

फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅप्ड, मुंबई. या संस्थेच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २४९३९४४५, ०२२ २४१३९५४२.

नॅशनल सोसायटी फॉर हँडिकॅप्ड, मुंबई. हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २५२२०२२४, ०२२ २५२२०२२५.

 

शुभांगी पुणतांबेकर

puntambekar.shubhangi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2016 1:03 am

Web Title: blind deaf and dumb handicapped helpline
Next Stories
1 अंध, अपंगांसाठी
2 महापालिका तक्रार निवारण कक्ष
3 अपघातसमयी मदतीसाठी..
Just Now!
X