‘आयपीएल म्हणजे एका छत्रछायेखाली आलेले क्रिकेट’ असा उल्लेख सारेच करतात, त्याच पाश्र्वभूमीवर देशोदेशीच्या सीमा पार करीत जगाला सुरेल करणाऱ्या संगीताच्या ‘कॅलिडोस्कोप’ने उद्घाटन सोहळ्याला ‘चार चाँद’ लावले. रवींद्र संगीताने या सोहळ्याची अप्रतिम नांदी किंग खान शाहरूख खानने पेश केली, त्यामध्ये ‘गीतांजली’ या नोबेल पारितोषिक विजेत्या कविता संग्रहातील पंक्ती ऐकताना ‘सिटी ऑफ जॉय’ बिरुदावली मिरवणारे शहर मंत्रमुग्ध झाले होते. त्यानंतर बॉलीवूड गाण्यांवर पेश झालेले नाच, हिंदी गाण्यांचा नजराणा, अमेरिकेचा ख्यातनाम गायक पिटबुलची अदाकारी, चीनच्या वादकांचे श्रवणीय संगीत, फटाक्यांची आतषबाजी या साऱ्यांनी आयपीएलचा सॉल्ट लेक स्टेडियमवरील आयपीएलचा उद्घाटन सोहळा चांगला रंगला.
शाहरूखच्या नांदीनंतर चीनच्या वादकांनी रंगमंचाचा ताबा घेत आपल्या सुरावटींनी आयपीएलच्या उद्घाटनाची रजनी श्रवणीय केली. त्यानंतर फुग्यांच्या ताटव्यांनी तरंगत आलेल्या ललनेने साऱ्यांचाच ठोका चुकवला. तरंगत खाली येत तिने आपल्या हातातून आणलेला आयपीएलचा चषक गतविजेता कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरच्या हाती सोपावला. त्याने तो चषक रंगमंचाच्या मध्यभागी ठेवला आणि अन्य संघांच्या कर्णधारांच्या पंक्तीत उभा राहिला. या वेळी ‘प्ले टफ, प्ले फेअर’ ही प्रतिज्ञा त्यांना देण्यात आली. या वेळी त्यांच्यासह बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि आयपीएल गव्हर्निग कौन्सिलचे अध्यक्ष राजीव शुक्लाही हजर होते. यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दीपप्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात केली.
बॉलीवूड गाण्यांवर प्रथम दीपिका पदुकोणने ‘तुम्ही हो बंधू’ या गाण्यावर अदाकारी पेश केली. कतरिना कैफ ‘शीला कि जवानी’पासून ‘चिकनी चमेली’ ते ‘जरा जरा टच मी’ या गाण्यांवर थिरकली. तब्बल ४५ मिनिटांच्या कालावधीनंतर शाहरुख पुन्हा एकदा रंगमंचावर आला तो ‘मै हूं डॉन’ या गाण्यावर नाचत. त्यानंतर त्याने बप्पी लहिरी आणि उषा उथ्थप यांच्यासोबत ‘हरी ओम हरी’ आणि ‘रंबा हो’ या गाण्यांवर ठेका धरत लाडक्या कोलकातावासियांची मने जिंकली. बॉलीवूड पेशकारीनंतर पिटबुलने ‘लेट्स स्टार्ट दी पार्टी’ या गाण्यावर साऱ्यांनाच ठेका धरायला लावला.
जवळपास १२० कलाकार आपली कला सादर करत असतानाच मैदानात नऊही संघांचे क्रिकेटमधील चेंडूंच्या आकाराचे फुगे ठेवण्यात आले होते. याबरोबरच आयपीएलच्या एका फुग्याने या सर्व संघांच्या फुग्यांना दोर बांधत आपल्या छायेखाली सारे संघ असल्याचे दाखवून दिले. हा कार्यक्रम सहा विभागांमध्ये विभागला गेला होता. १ तास आणि ४५ मिनिटांच्या कार्यक्रमांमध्ये तब्बल ४० कलाकारांनी भाग घेतला होता.
आयपीएल –  वेळापत्रक
दिनांक     संघ    प्रतिस्पर्धी    स्थळ    वेळ
३ एप्रिल    कोलकाता नाइट रायडस    दिल्ली डेअरडेव्हिस    कोलकाता     रा. ८ वा.
४ एप्रिल    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू    मुंबई इंडियन्स    बंगळुरू    रा. ८ वा.
५ एप्रिल    सनराजर्स हैदराबाद    पुणे वॉरियर्स    हैदराबाद    रा. ८ वा.
६ एप्रिल    दिल्ली डेअरडेव्हिस    राजस्थान रॉयल्स    दिल्ली    सं. ४ वा.
६ एप्रिल    चेन्नई सुपर किंग्ज    मुंबई इंडियन्स    चेन्नई     रा. ८ वा.
७ एप्रिल    पुणे वॉरियस    किंग्ज इलेव्हन पंजाब    पुणे    सं. ४ वा.
७ एप्रिल    सनराजर्स हैदराबाद    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू    हैदराबाद    रा. ८ वा.
८ एप्रिल    राजस्थान रॉयल्स    कोलकाता नाइट रायडर्स    जयपूर    रा. ८ वा.
९ एप्रिल    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू    सनराजर्स हैदराबाद    बंगळुरू    सं. ४ वा.
९ एप्रिल    मुंबई इंडियन्स    दिल्ली डेअरडेव्हिस    मुंबई    रा. ८ वा.
१० एप्रिल    किंग्ज इलेव्हन पंजाब    चेन्नई सुपर किंग्ज    मोहाली    रा. ८ वा.
११ एप्रिल    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू     कोलकाता नाइट रायडर्स    बंगळुरू    सं. ४ वा.
१२ एप्रिल    पुणे वॉरियर्स     राजस्थान रॉयल्स    पुणे    रा. ८ वा.
१२ एप्रिल    दिल्ली डेअरडेव्हिस    सनराजर्स हैदराबाद    दिल्ली    रा. ८ वा.
१३ एप्रिल    मुंबई इंडियन्स    पुणे वॉरियर्स    मुंबई    सं. ४ वा.
१३ एप्रिल    चेन्नई सुपर किंग्ज    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू    चेन्नई     रा. ८ वा.
१४ एप्रिल    कोलकाता नाइट रायडस    सनराजर्स हैदराबाद    कोलकाता    सं. ४ वा.
१४ एप्रिल    राजस्थान रॉयल्स    किंग्ज इलेव्हन पंजाब    जयपूर    रा. ८ वा.
१५ एप्रिल    चेन्नई सुपर किंग्ज    पुणे वॉरियर्स    चेन्नई    रा. ८ वा.
१६ एप्रिल    किंग्ज इलेव्हन पंजाब    कोलकाता नाइट रायडर्स    मोहाली    सं. ४ वा.
१६ एप्रिल    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू    दिल्ली डेअरडेव्हिस    बंगळुरू    रा. ८ वा.
१७ एप्रिल    पुणे वॉरियर्स    सनराजर्स हैदराबाद    पुणे    सं. ४ वा.
१७ एप्रिल    राजस्थान रॉयल्स    मुंबई इंडियन्स    जयपूर    रा. ८ वा.
१८ एप्रिल    दिल्ली डेअरडेव्हिस    चेन्नई सुपर किंग्ज    दिल्ली    रा. ८ वा.
१९ एप्रिल    सनराजर्स हैदराबाद    किंग्ज इलेव्हन पंजाब    हैदराबाद    रा. ८ वा.
२० एप्रिल    कोलकाता नाइट रायडर्स    चेन्नई सुपर किंग्ज    कोलकाता    सं. ४ वा.
२० एप्रिल    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू    राजस्थान रॉयल्स    बंगळुरू    रा. ८ वा.
२१ एप्रिल    दिल्ली डेअरडेव्हिस    मुंबई इंडियन्स    दिल्ली    सं. ४ वा.
२१ एप्रिल    किंग्ज इलेव्हन पंजाब    पुणे वॉरियर्स    मोहाली    रा. ८ वा.
२२ एप्रिल    चेन्नई सुपर किंग्ज    राजस्थान रॉयल्स    चेन्नई    रा. ८ वा.
२३ एप्रिल    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू    पुणे वॉरियर्स    बंगळुरू    सं. ४ वा.
२३ एप्रिल    दिल्ली डेअरडेव्हिस    किंग्ज इलेव्हन पंजाब    दिल्ली    रा. ८ वा.
२४ एप्रिल    कोलकाता नाइट रायडर्स    मुंबई इंडियन्स    कोलकाता    रा. ८ वा.
२५ एप्रिल    चेन्नई सुपर किंग्ज    सनराजर्स हैदराबाद    चेन्नई    रा. ८ वा.
२६ एप्रिल    कोलकाता नाइट रायडर्स    किंग्ज इलेव्हन पंजाब    कोलकाता    रा. ८ वा.
२७ एप्रिल    राजस्थान रॉयल्स    सनराजर्स हैदराबाद    जयपूर    सं. ४ वा.
२७ एप्रिल    मुंबई इंडियन्स    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू    मुंबई    रा. ८ वा.
२८ एप्रिल    चेन्नई सुपर किंग्ज    कोलकाता नाइट रायडर्स    चेन्नई    सं. ४ वा.
२८ एप्रिल    दिल्ली डेअरडेव्हिस    पुणे वॉरियर्स    रायपूर    रा. ८ वा.
२९ एप्रिल    राजस्थान रॉयल्स    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू    जयपूर    सं. ४ वा.
२९ एप्रिल    मुंबई इंडियन्स    किंग्ज इलेव्हन पंजाब    मुंबई    रा. ८ वा.
३० एप्रिल    पुणे वॉरियर्स     चेन्नई सुपर किंग्ज    पुणे    रा. ८ वा.
१ मे    सनराजर्स हैदराबाद    मुंबई इंडियन्स     हैदराबाद    सं. ४ वा.
१ मे    दिल्ली डेअरडेव्हिस    कोलकाता नाइट रायडर्स    रायपूर    रा. ८ वा.
२ मे    चेन्नई सुपर किंग्ज    किंग्ज इलेव्हन पंजाब    चेन्नई    सं. ४ वा.
२ मे    पुणे वॉरियर्स    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू    पुणे    रा. ८ वा.
३ मे    कोलकाता नाइट रायडर्स     राजस्थान रॉयल्स    कोलकाता    रा. ८ वा.
४ मे    सनराजर्स हैदराबाद    दिल्ली डेअरडेव्हिस    हैदराबाद    रा. ८ वा.
५ मे    मुंबई इंडियन्स    चेन्नई सुपर किंग्ज    मुंबई    सं. ४ वा.
६ मे    राजस्थान रॉयल्स     पुणे वॉरियर्स    जयपूर    रा. ८ वा.
६ मे    किंग्ज इलेव्हन पंजाब    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू    मोहाली    रा. ८ वा.
७ मे    राजस्थान रॉयल्स     दिल्ली डेअरडेव्हिस    जयपूर    सं. ४ वा.
७ मे    मुंबई इंडियन्स    कोलकाता नाइट रायडर्स    मुंबई    रा. ८ वा.
८ मे    सनराजर्स हैदराबाद    चेन्नई सुपर किंग्ज    हैदराबाद    रा. ८ वा.
९ मे    किंग्ज इलेव्हन पंजाब     राजस्थान रॉयल्स    मोहाली    सं. ४ वा.
९ मे    पुणे वॉरियर्स कोलकाता     नाइट रायडर्स    पुणे    रा. ८ वा.
१० मे    दिल्ली डेअरडेव्हिस    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू    दिल्ली    रा. ८ वा.
११ मे    पुणे वॉरियर्स     मुंबई इंडियन्स     पुणे    सं. ४ वा.
१२ मे    किंग्ज इलेव्हन पंजाब     सनराजर्स हैदराबाद     मोहाली    रा. ८ वा.
१२ मे    कोलकाता नाइट रायडर्स    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू    रांची    सं. ४ वा.
१२ मे    राजस्थान रॉयल्स     चेन्नई सुपर किंग्ज    जयपूर    रा. ८ वा.
१३ मे    मुंबई इंडियन्स    सनराजर्स हैदराबाद     मुंबई    रा. ८ वा.
१४ मे    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू     किंग्ज इलेव्हन पंजाब    बंगळुरू    सं. ४ वा.
१४ मे    चेन्नई सुपर किंग्ज     दिल्ली डेअरडेव्हिस    चेन्नई     रा. ८ वा.
१५ मे    कोलकाता नाइट रायडर्स     पुणे वॉरियर्स    रांची    सं. ४ वा.
१५ मे    मुंबई इंडियन्स    राजस्थान रॉयल्स    मुंबई    रा. ८ वा.
१६ मे    किंग्ज इलेव्हन पंजाब     दिल्ली डेअरडेव्हिस    धरमशाला    रा. ८ वा.
१८ मे    सनराजर्स हैदराबाद    राजस्थान रॉयल्स    हैदराबाद    रा. ८ वा.
१८ मे    किंग्ज इलेव्हन पंजाब     मुंबई इंडियन्स     धरमशाला    सं. ४ वा.
१८ मे     रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू     चेन्नई सुपर किंग्ज    बंगळुरू    रा. ८ वा.
१८ मे    पुणे वॉरियर्स     दिल्ली डेअरडेव्हिस    पुणे    सं. ४ वा.
१९ मे    सनराजर्स हैदराबाद    कोलकाता नाइट रायडर्स    हैदराबाद    रा. ८ वा.
 २१ मे                                 क्वालिफायर १     चेन्नई    रा. ८ वा.
२२ मे                                  एलिमिनेटर     चेन्नई    रा. ८ वा.
२३ मे                                 क्वालिफायर २     कोलकाता    रा. ८ वा.
 २६ मे                         अंतिम सामना    कोलकाता    रा. ८ वा.