BCCI to increase domestic cricketer salary : आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना मोठी रक्कम मिळते. दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. बीसीसीआय लवकरच देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी मोठा निर्णय घेणार आहे. बीसीसीआयमध्ये अनेक विषयांवर चर्चा सुरू असून आयपीएलमुळे देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे, जिथे खेळाडू एक हंगाम खेळून कोट्यवधी रुपये कमावतात. त्यामुळे आता देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात लवकरच वाढ होऊ शकते.

बीसीसीआय लवकरच मोठा निर्णय घेणार –

क्रिकबझच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या पगारात वाढ करू शकते. त्याच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्याची जबाबदारी अजित आगरकर यांच्या निवड समितीकडे सोपविण्यात आली आहे. वृत्तानुसार, देशांतर्गत क्रिकेटपटूंची फी किमान दुप्पट असावी, असे बीसीसीआयचे मत आहे. यामध्ये १० रणजी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना बोर्ड ७५ लाख ते १ कोटी रुपये वार्षिक मानधन देऊ शकते. ज्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडू पाकिस्तानच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानपैक्षा जास्त कमावू शकतात.

2 Indian spies expelled from Australia
भारतीय हेरांची ऑस्ट्रेलियातून गुपचूप हकालपट्टी
India, nuclear weapons,
विश्लेषण : २५ वर्षांत प्रथमच भारताकडे पाकिस्तानपेक्षा अधिक अण्वस्त्रे, चीनकडे मात्र भारतापेक्षा तिप्पट अण्वस्त्रे!
Virat Kohli form in focus ahead of final group clash
कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष;भारताची आज कॅनडाशी अखेरची साखळी लढत, बुमरा, पंतकडून अपेक्षा
Shahid Afridi opens up on IPL's influence on cricket's transformation
T20 WC 2024 : ‘क्रिकेट आता एक व्यवसाय झालाय…’, आयपीएलबद्दल माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचे मोठे वक्तव्य
Chris Gayle Special Jacket with India pakistan Flag for IND vs PAK Match
IND vs PAK: एका हातावर भारताचा तिरंगा तर दुसरीकडे पाकिस्तानचा हिरवा रंग, ख्रिस गेलचा चित्ताकर्षक ड्रेस, VIDEO व्हायरल
India vs Pakistan T20 World Cup Ticket Price
बापरे! १.४६ कोटी रुपये ही घराची किंमत नाही तर भारत-पाकिस्तान सामन्याचं एक तिकीट; ब्लॅक मार्केटची किंमत ऐकून डोकं चक्रावेल
Rishabh Pant Reaction on Fans Chant Tel Lagao Dabur Ka Wicket Lo Babar Ka
“….विकेट गिराओ बाबर का”, IND vs PAK सामन्यापूर्वी ऋषभ पंतचा VIDEO व्हायरल; पाहा नेमकं काय झालं?
Ind s Pak T20 WC 2024 Updates in Marathi
“…तर भारताला ‘ती’ चूक महागात पडणार”, IND vs PAK सामन्यापूर्वी कामरान अकमलचा विराटबद्दल टीम इंडियाला इशारा

आता देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचे मानधन किती?

सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवाच्या आधारे वेतन दिले जाते. ४० पेक्षा जास्त रणजी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआय प्रतिदिन ६०,००० रुपये, २१ ते ४० सामने खेळणाऱ्यांना ५०,००० रुपये आणि २० सामने खेळणाऱ्यांना खेळाडूंना ४०,००० रुपये मानधन देते. या वेतनश्रेणीवर, एखाद्या वरिष्ठ क्रिकेटपटूला त्याचा संघ अंतिम फेरीत पोहोचल्यास २५ लाख रुपयांपर्यंतची कमाई होते, तर संघातील इतर खेळाडूंना १७ लाख ते ११ लाख रुपये मिळतात.

हेही वाचा – DC vs GT : ट्रिस्टन स्टब्सच्या सीमारेषेवरील शानदार फिल्डिंगने सामन्याला दिली कलाटणी, VIDEO व्हायरल

बाबर-रिझवान किती कमावतात?

जर आपण नवीन वेतन प्रणालीवर नजर टाकली तर, जर देशांतर्गत भारतीय क्रिकेटपटू रणजी ट्रॉफी व्यतिरिक्त इतर सर्व देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेतात. मग त्याची वार्षिक कमाई कित्येक कोटी रुपये असू शकते. जर आपण पाकिस्तानी संघाचे मुख्य फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांच्याबद्दल बोललो तर ते दोघेही पीसीबीच्या केंद्रीय करार सूचीच्या श्रेणी A मध्ये येतात. पाकिस्तानमध्ये ‘अ’ श्रेणीतील खेळाडूंना भारतीय चलनानुसार दरमहा १३.१५ लाख रुपये मिळतात. आता एखाद्या भारतीय क्रिकेटपटूने महिन्याभरात २-३ रणजी सामने खेळले तरी तो बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानपेक्षा जास्त कमाई करू शकतो.

हेही वाचा – DC vs GT : दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल संतापला, ‘या’ खेळाडूला धरले जबाबदार

बीसीसीआयला कसोटी क्रिकेटला द्यायचे आहे प्रोत्साहन –

बीसीसीआय कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत, वर्षभरात ७५% पेक्षा जास्त कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या मॅच फीमध्ये ३००% वाढ होईल. त्याचवेळी बीसीसीआयने नुकतेच केंद्रीय करारात समाविष्ट असलेल्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले होते. अशा परिस्थितीत बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना आणत आहे.