News Flash

भारतीय संघातली निवड अंबाती रायडूने ठरवली सार्थ, झळकावलं आयपीएलमधलं पहिलं शतक

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रायडूने ६२ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली.

शतकवीर अंबाती रायडू

आठवड्याभरापूर्वी बंगळुरुत पार पडलेल्या निवड समितीच्या बैठकीत, इंग्लंडविरुद्ध वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी अंबाती रायडूची निवड करण्यात आली. आपल्या घरच्या मैदानावर खेळताना अंबाती रायडूने हैदराबादविरुद्ध शतक झळकावत आपली निवड १०० टक्के योग्य असल्याचं सिद्ध करुन दाखवलं आहे. अंबाती रायडूच्या शतकाच्या जोरावर चेन्नईने हैदराबादवर ८ गडी राखून मात केली. रायडूने झळकावलेलं शतक हे आयपीएलच्या अकराव्या हंगामातलं चौथ शतक ठरलं आहे. याचसोबत आयपीएलमधलं रायडूचं हे पहिलचं शतक ठरलं आहे.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रायडूने ६२ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली. रायडूच्या या खेळीत ७ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. याआधी अकराव्या हंगामात शेन वॉटसन, ख्रिस गेल आणि ऋषभ पंत यांनी शतक झळकावलं आहे. रायडूच्या या खेळीचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.

सामना संपल्यानंतर अंबाती रायडूने आपला किताब स्विकारताना, भारतीय संघात निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सध्या मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेतो आहे. शेन वॉटसनसोबत खेळताना आम्ही एकमेकांना सांभाळून घेत मैदानात वावरत असतो. याच कारणामुळे मी मैदानात खुलून फटकेबाजी करु शकत असल्याचं रायडू म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2018 10:27 pm

Web Title: ipl 2018 ambati rayudu slams maiden ipl hundred
टॅग : Csk,IPL 2018
Next Stories
1 Video: रविंद्र जाडेजाच्या अंगावर का धावून गेला महेंद्रसिंह धोनी?
2 मुंबईसाठी प्लेऑफचा रस्ता खडतर, राजस्थान ७ गडी राखून विजयी
3 IPL 2018 – चाहत्याचं प्रेम पाहून विराटही झाला थक्क, एका सेल्फीसाठी ‘त्या’ने सुरक्षेचं कडं भेदलं
Just Now!
X