जवळपास दोन वर्षांनंतर इंडियन प्रिमीयर लीगमध्ये परतणाऱ्या राजस्थान रॉयल्स या संघावर यंदा क्रीडारसिकांच्या नजरा लागून राहणार आहेत. या संघातील सर्वच खेळाडूंच्या खेळावर अनेकांचं लक्ष असेल. प्रामुख्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंच्या यादीत येणाऱ्या जयदेव उनाडकटही संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

गेल्या वर्षीसुद्धा त्याने आयपीएलमध्ये १३.२४ च्या सरासरीने एकूण २४ गडी बाद केले होते. त्याची हीच कामगिरी पाहता यंदाच्या आयपीएलच्या हंगामात उनाडकडची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असं राजस्थान रॉयल्सचे बॉलिंग कोच साईराज बहुतूळे यांचं म्हणणं आहे.

वाचा : जास्त डोकं चालवू नकोस…काश्मीर प्रश्नावरुन केलेल्या आफ्रिदीच्या वक्तव्याला भारताच्या गब्बरचं सडेतोड उत्तर

राजस्थान रॉयल्यची आयपीएलमधील कामगिरी यंदाच्या हंगामात नेमकी कशी असणार, याविषयीच त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना माहिती दिली. ‘अर्थात संघातील प्रत्येक खेळाडू विशेषत: गोलंदाजांचा खेळ महत्त्वाचा ठरणार आहे. पण, त्यातही काही महत्त्वाच्या खेळाडूंसोबत सर्व खेळाडूंचा जम बसतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकट्या जयदेववरच रायस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीची धुरा असणार आहे, असं नाही. पण, तो निश्चितच आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे. स्थानिक पातळीवरील सामन्यांमध्ये त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत, असं ते म्हणाले. त्याशिवाय यंदाच्या हंगामात फिरकी गोलंदाज प्रभावी कामगिरी करतील, अशा आशा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे खुद्द प्रशिक्षकांच्या अपेक्षा पाहता या अपेक्षा पूर्ण करत जयदेवय आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चमकतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.