काश्मीर प्रकरणावर पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने केलेल्या वक्तव्याचा भारताच्या सर्वच खेळाडूंनी चांगला समाचार घेतला. काश्मीरमध्ये भारतीय सरकारद्वारे जनतेवर अत्याचार केले जात असून संयुक्त राष्ट्रांनी यात लक्ष घालावं अशा स्वरुपाची मागणी आफ्रिदीने ट्विटरवरुन केली होती. यानंतर भारतीय संघाचा गब्बर फलंदाज म्हणून ओळख असलेल्या शिखर धवनने शाहिद आफ्रिदीला चांगलच प्रत्युत्तर दिलं आहे.

अवश्य वाचा – उगाच बाहेरच्यांनी येऊन आम्हाला शिकवू नये, आफ्रिदीच्या वक्तव्यावर सचिनचा संताप

भारताला सल्ले देण्याऐवजी आधी स्वतःच्या देशाची हालत सुधार. तुझे विचार तुझ्यापाशीच ठेव आणि जास्त डोकं चालवतं जाऊ नकोस अशा आशायाचं ट्वीट करत शिखर धवनने आफ्रिदीची बोलती बंद केली आहे.

शाहिद आफ्रिदीने केलेल्या वक्तव्यानंतर इशांत शर्मा, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि गौतम गंभीर यासारख्या आजी-माजी खेळाडूंनी शाहिदला चांगलचं सुनावलं होतं. भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये आफ्रिदीने वक्तव्य करण्याची गरज नसल्याचं भारतीय क्रीडापटूंनी बोलून दाखवलं होतं.

अवश्य वाचा – माझ्यासाठी देश पहिला, विराट कोहलीचं शाहिद आफ्रिदीला सणसणीत उत्तर