18 October 2019

News Flash

IPL 2018 – प्ले ऑफचे सामने पुण्याऐवजी लखनऊला हलवणार?, बीसीसीआयकडून चाचपणी सुरु

राजकोट, कोलकाता शहरही शर्यतीत, मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये.

पुणे प्लेऑफच्या सामन्यांचं यजमानपद गमावणार?

चेन्नईत कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावरुन होत असलेल्या विरोधामुळे, पुण्याच्या गहुंजे मैदानाला चेन्नईच्या घरच्या सामन्यांचं यजमानपद भूषविण्याचा मान मिळाला. महेंद्रसिंह धोनी सारखा खेळाडू पुण्यात खेळणार असल्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचं वातावरण होतं, मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्याच्या गहुंजे मैदानावर होणारे आयपीएल प्लेऑफचे सामने लखनऊच्या मैदानावर हलवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

“गहुंजेच्या मैदानापेक्षा लखनऊच्या मैदानाची प्रेक्षकसंख्या जास्त आहे. अंदाजे ५० हजार प्रेक्षक लखनऊच्या मैदानात सामना पाहू शकतात. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. लखनऊच्या मैदानाची पाहणी करण्यासाठी आमचं एक पथक रवाना झालेलं आहे. यानंतरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल.” टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

अवश्य वाचा – अटीतटीच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज ठरली सरस, हैदराबादवर ४ धावांनी मात

लखनऊसोबत राजकोट आणि कोलकाता या दोन ठिकाणीही प्लेऑफचे सामने हलवले जाऊ शकतात. मात्र बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शहा प्लेऑफचे सामने राजकोटच्या मैदानावर खेळवण्यासाठी आग्रही असल्याचं समजतंय. त्यातचं चेन्नई सुपर किंग्ज आपले घरचे सामने पुण्याच्या मैदानावर खेळणार असल्यामुळे बीसीसीआय प्लेऑफचे सामने अन्यत्र हलवण्याच्या मनस्थितीत आहे.

First Published on April 22, 2018 9:05 pm

Web Title: ipl 2018 ipl playoffs may be shifted from pune to lucknow
टॅग IPL 2018