20 February 2019

News Flash

IPL 2018: धोनीमुळे माझी फलंदाजी बहरली – शेन वॉटसन

अखेरच्या सामन्यात चेन्नईची पंजाबवर मात

शेन वॉटसनची यंदाच्या हंगामात अष्टपैलू खेळी

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जचा संघ पुन्हा एकदा आयपीएलच्या प्ले-ऑफ सामन्यांसाठी पात्र ठरला आहे. चेन्नईच्या संघातली बहुतांश खेळाडूंनी या यशाचं श्रेय कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिलं आहे. यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू व चेन्नईचा सलामीचा फलंदाज शेन वॉटसननेही यंदाच्या हंगामात आपल्या बहरलेल्या फलंदाजीचं श्रेय कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिलं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या माजी खेळाडूने आतापर्यंत चेन्नईकडून खेळताना ४३८ धावा केल्या असून त्याच्या नावावर ६ बळी जमा आहेत. प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये चेन्नईची पहिली गाठ हैदराबादच्या संघाशी पडणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास चेन्नईचा संघ अंतिम फेरी गाठू शकणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत वॉटसनने धोनीचं कौतुक केलं आहे.

“चेन्नईकडून मला यंदाच्या हंगामात सलामीला येण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. ज्यावेळी धोनीला माझी गरज होती त्यावेळी गोलंदाजीतही मी माझं कौशल्य दाखवलं आहे. आपल्या कर्णधाराच्या गरजेला एक खेळाडू म्हणून स्वतः हजर असणं आणि चांगली कामगिरी करणं ही आश्वासक गोष्ट आहे.” धोनीच्या दुरदृष्टीमुळेच माझी यंदाच्या हंगामात फलंदाजी बहरली असल्याचं वॉटसन म्हणाला. त्यामुळे प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये वॉटसन कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First Published on May 21, 2018 9:58 pm

Web Title: ipl 2018 shane watson reveals ms dhoni is the reason for his ipl form