07 April 2020

News Flash

अवघ्या ५१ चेंडूत शतकाला गवसणी घालणाऱ्या शेन वॅटसनचा ‘या’ क्लबमध्ये झाला समावेश

शेन वॅटसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या बॅटची धार अद्यापही कमी झालेली नाही. ऑस्ट्रेलियाच्या या गुणवान खेळाडूने शुक्रवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध आपल्या कामगिरीतून

शेन वॉटसन

शेन वॅटसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या बॅटची धार अद्यापही कमी झालेली नाही. ऑस्ट्रेलियाच्या या गुणवान खेळाडूने शुक्रवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध अवघ्या ५१ चेंडूंमध्ये शतक झळकावून आपल्या फलंदाजीतील प्रतिभा दाखवून दिली. ५७ चेंडूंमध्ये १०६ धावा फटकावून वॅटसनने काही मोजक्या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. आयपीएलमध्ये दोनवेळा मालिकावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या वॅटसनचे हे आयपीएलमधील तिसरे शतक ठरले.

एबी डिव्हिलियर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर सुद्धा आयपीएलमध्ये तीन शतके आहेत. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आयपीएलमधील सर्वाधिक सहा शतके आहे. त्याने गुरुवारीच सनरायजर्स हैदराबादविरुद्ध शतक झळकावले. गेलचे आयपीएलच्या ११ व्या मोसमातील हे पहिले शतक आहे. गेल खालोखाल शतकांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीचा क्रमांक लागतो. कोहलीच्या नावावर आयपीएलमध्ये चार शतके आहेत.

ब्रेनडॉन मॅक्कलम, हाशिम आमला, मुरली विजय, अॅडम गिलख्रिस्ट आणि विरेंद्र सेहवाग यांच्या नावावर आयपीएलमध्ये प्रत्येकी दोन शतके आहेत. राजस्थानच्या खेळाडूंनी दोनदा वॅटसनचा झेल सोडला. त्यानंतर मात्र वॅटसनने त्यांना या चुकीची किंमत मोजायला लावली. वॅटसनची आयपीएलमध्ये कामगिरी नेहमीच उजवी राहिली आहे. त्याने आतापर्यंत १०६ सामन्यांमध्ये २७०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यात तीन शतक आणि चौदा अर्धशतकांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 3:03 am

Web Title: shane watson chennai super kings rajasthan royals ipl
Next Stories
1 IPL 2018 : चेन्नई सुपर किंग्जच्या शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक
2 IPL 2018 – चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सवर ६४ धावांनी विजय
3 डिव्हिलियर्स माझ्यापेक्षा कांकणभर सरसच – विराट कोहली
Just Now!
X