आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुद्ध सनरायर्जस हैदराबाद या संघांमध्ये गुरुवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात बंगळुरुच्या ए. बी. डिव्हीलियर्सच्या कॅचचे मोठे कौतुक होत आहे. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील उत्कृष्ट कॅचेसच्या तुलनेत एक सुपर कॅच घेतली. त्यामुळे त्याच्या या कामगिरीची तुलना सुपरमॅन अशी होत आहे. बंगळूरू येथील मैदानावर हा सामना प्रत्यक्ष पाहलेल्या प्रेक्षकांसाठी हा एक अविस्मरणीय झेल ठरला.
Presenting to you Superman @ABdeVilliers17 #RCBvSRH pic.twitter.com/NYjUWpuwtT
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2018
बंगळूरूच्या संघाने दिलेल्या २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या अॅलेक्स हेल्सने पाय क्रिझ बाहेर काढून मोईन अलीला उंच फटका मारला. मात्र, उंचीवरून जाणारा हा झेल डिव्हीलियर्सने हवेत झेपावत अप्रतिमरित्या घेतला. हा झेल पाहताना कर्णधार विराट कोहलीसह जगभरातील प्रेक्षकांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
मात्र, त्यानंतर सोशल मीडियात अपेक्षेप्रमाणे या झेलबद्दल प्रतिक्रियांचा पाऊस पडला. तसेच अधिकाधिक लोकांनी या झेलचा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरुन रिट्विट केला.