News Flash

Video : धोनीची दांडी गुल करणारा वरुण चक्रवर्ती म्हणतो…

KKR विरुद्ध चेन्नईने हातातला सामना गमावला

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जला पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. अबु धाबीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईवर १० धावांनी मात केली. मोक्याच्या क्षणी KKR च्या गोलंदाजांनी केलेलं पुनरागमन आणि अखेरच्या षटकांत सुनिल नारायण व वरुण चक्रवर्तीचा खुबीने वापर करत कोलकाताने सामन्याचं चित्र बदलून टाकलं. चेन्नईकडून शेन वॉटसनने ५० धावांची खेळी केली, मात्र मोक्याच्या क्षणी मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली निराशाजनक कामगिरी चेन्नईला चांगलीच महागात पडली. चेन्नईचा संघ १५७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

अवश्य वाचा – IPL 2020 : …म्हणून केदार जाधवला जाडेजा-ब्राव्होआधी फलंदाजीसाठी पाठवलं – स्टिफन फ्लेमिंग

मोक्याच्या क्षणी कोलकाताच्या गोलंदाजांनी विकेट घेतल्यामुळे चेन्नईचा संघ काहीसा बॅकफूटवर गेला. दिनेश कार्तिकने सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांचा सुरेख वापर करत चेन्नईच्या फलंदाजांवर दबाव आणला. महेंद्रसिंह धोनीने हा दबाव झुगारत फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण यात त्याला अपयश आलं. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना तो ११ धावा काढून माघारी परतला. धोनीसारख्या फलंदाजांची विकेट घेणं हे कोणत्याही फलंदाजाचं स्वप्न असतं. सामना संपल्यानंतर एका खास मुलाखतीत वरुण चक्रवर्तीने धोनीला कसं बाद केलं याबद्दलची माहिती दिली.

“धोनी मैदानावर असताना माझ्यावर दबाव होता. तीन वर्षांपूर्वी मी धोनी खेळत असताना चेपॉकवर सामने पहायला जायचो. त्याला गोलंदाजी करणं हा माझ्यासाठी खरंच खूप अभिमानास्पद क्षण होता. खेळपट्टीही खूप फ्लॅट होती. धोनी फटकेबाजी करण्याच्या तयारी होता, त्यामुळे मी चेंडू गुड लेंथवर ठेवला तर त्याला बाद करु शकेन असं मला वाटलं. सुदैवाने माझी रणनिती सफल ठरली आणि मी त्याला बाद करु शकलो. सामना संपल्यानंतर मी धोनीसोबत फोटोही घेतला.” IPL संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत वरुण चक्रवर्ती बोलत होता. सामना गमावल्यानंतर सोशल मीडियावर चेन्नईचे चाहते चांगलेच नाराज आहेत. त्यामुळे यापुढील सामन्यात धोनी संघात काय बदल करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : CSK ने हातातला सामना गमावल्यावर धोनी म्हणतो, फलंदाजांनी निराश केलं !

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 2:26 pm

Web Title: bowling to dhoni a surreal moment after watching him from chepauk stands says varun chakravarthy psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : …म्हणून केदार जाधवला जाडेजा-ब्राव्होआधी फलंदाजीसाठी पाठवलं – स्टिफन फ्लेमिंग
2 IPL 2020 : CSK ने हातातला सामना गमावल्यावर धोनी म्हणतो, फलंदाजांनी निराश केलं !
3 IPL 2020 : CSK चे चाहते केदार जाधवर नाराज, हे ३ खेळाडू घेऊ शकतात संघात त्याची जागा
Just Now!
X