News Flash

IPL 2020 : रोहितला लवकर गमावूनही मुंबईच्या फलंदाजांचा ‘पॉवरप्ले’मध्ये राडा

डी-कॉक, सूर्यकुमारने नोंदवली हंगामातली सर्वोच्च धावसंख्या

फोटो सौजन्य - IPL

आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफचा सामना खेळत असताना गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवला आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डॅनिअल सम्सच्या गोलंदाजीवर क्विंटन डी-कॉकने पहिल्याच षटकात १५ धावा वसूल करत चांगली सुरुवात केली. मात्र यानंतर दुसऱ्याच षटकात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आश्विनच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला.

महत्वाच्या सामन्यात कर्णधार माघारी परतल्यानंतरही डी-कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी कोणतही दडपण न घेता फटकेबाजी सुरु ठेवली. दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत मुंबईने यंदाच्या हंगामात पॉवरप्लेमधली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबईची पॉवरप्लेमधली आतापर्यंतची कामगिरी –

  • ६३/१ – विरुद्ध दिल्ली – दुबई*
  • ५९/१ – विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – अबु धाबी
  • ५९/१ – विरुद्ध राजस्थान रॉयल्स – अबु धाबी
  • ५७/१ – विरुद्ध राजस्थान रॉयल्स – अबु धाबी

रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर डी-कॉक आणि सूर्यकुमार जोडीने संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात डी-कॉक सीमारेषेवर शिखर धवनकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने २५ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ४० धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 8:24 pm

Web Title: ipl 2020 dc vs mi despite loosing rohit early mumbai registered highest total in powerplay psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 MI vs DC: मुंबईचा दिल्लीवर दणदणीत विजय; सहाव्यांदा अंतिम फेरीत धडक
2 VIDEO: जंगी सेलिब्रेशन! दुबईत असा साजरा झाला विराटचा वाढदिवस
3 Women’s T20 : ट्रेलब्लेझर्सकडून वेलॉसिटीचा धुव्वा, ४७ धावांत गुंडाळला संपूर्ण संघ
Just Now!
X