27 November 2020

News Flash

IPL 2020: राशिदच्या फिरकीपुढे दिल्लीकर हतबल, हैदराबादचा पहिला विजय

बेअरस्टोची अर्धशतकी खेळी, राशिद खानचे ३ बळी

राशिद खान (फोटो- IPL.com)

दिल्लीविरूद्धच्या सामन्यात हैदराबादने आपला स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने २० षटकात ४ बाद १६२ धावा केल्या. जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक आणि त्याला वॉर्नर, विल्यमसन यांच्या फटकेबाजीची मिळालेली साथ यांच्या जोरावर हैदराबादच्या संघाने १६०पार मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाकडून कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. राशिद खानच्या फिरकीपुढे दिल्लीला १५ धावांनी हार पत्करावी लागली.

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनी दमदार खेळ करत संघाला ७७ धावांची सलामी मिळवून दिली. कर्णधार म्हणून आपला ५०वा सामना खेळणारा वॉर्नर सामन्यात मात्र अर्धशतक ठोकू शकला नाही. दमदार फटकेबाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचं अर्धशतक पाच धावांनी हुकलं. त्याने ३३ चेंडूत ४५ धावा केल्या. बेअरस्टोने ४८ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार लगावत ५३ धावा केल्या. विल्यमसननेदेखील चांगली फलंदाजी केली. त्याने २६ चेंडूत ५ चौकारांसह ४१ धावा केल्या. तर आपला पहिला IPL सामना खेळणारा अब्दुल समाद याने १ चौकार आणि १ षटकार ठोकत ७ चेंडूत नाबाद १२ धावा केल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात सलामीवीर पृथ्वी शॉ बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि शिखर धवनने डाव सावरला. या दोघांनी भागीदारी होत असतानाच कर्णधार अय्यर १७ धावांवर बाद झाला. मग ऋषभ पंतने धवनला साथ दिली. पण धवनदेखील फटकेबाजीच्या नादात ३४ धावांवर माघारी परतला. शिमरॉन हेटमायरने फटकेबाजीचा प्रयत्न केला परंतु तो १२ चेंडूत २ षटकारांसह २१ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ पंत २८ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर सामना दिल्लीच्या हातातून निसटतच गेला आणि हैदराबादने १५ धावांनी विजय मिळवला. राशिद खानने शिखर धवन, कर्णधार अय्यर आणि ऋषभ पंत हे तीन महत्त्वाचे बळी घेत हैदराबादला स्पर्धेत विजयाचं खातं उघडण्यास मदत केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 7:27 pm

Web Title: ipl 2020 dc vs srh live updates david warner shreyas iyer kane williamson rishabh pant rashid khan vjb 91
Next Stories
1 IPL 2020: मुंबईच्या पराभवानंतर इशान किशनचा ‘तो’ फोटो व्हायरल
2 IPL 2020: धोनीच्या खराब कामगिरीवर गांगुली म्हणतो…
3 IPL 2020: मुंबई-बंगळुरू सामन्यावर सचिनचं मोजक्या शब्दांत भाष्य, म्हणाला…
Just Now!
X