गतविजेच्या मुंबई इंडियन्सवर मात करुन चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात धडाकेबाज पद्धतीने केली. मात्र यानंतर दुसऱ्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सचे चेन्नईचं विमान जमिनीवर आणलं. संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. मुंबई आणि राजस्थान या दोन्ही सामन्यात चेन्नईचा कर्णधार धोनी हा फलंदाजीसाठी उशीरा मैदानात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीला फलंदाजी करताना पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर आहेत. परंतू दोन्ही सामन्यांत त्यांच्या पदरी निराशाच पडली.

विशेषकरुन राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीने सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणं अनेकांना रुचलं नाही. संघाला गरज असताना धोनी पाठीमागे राहतो याला नेतृत्व करणं म्हणत नाही अशी टीका अनेकांनी केली. आपल्यावर होत असलेल्या टीकेना धोनीने उत्तर दिलं आहे. परंतू संघबांधणीच्या दृष्टीने धोनीने काही सामन्यांत प्रयोग केले तर त्यात इतका गहजब करायची गरज काय?? धोनीवर टीका करताना त्याची दुसरी बाजूही समजून घ्यायला हवी.