News Flash

IPL 2020 : कोट्रेलची धुलाई केल्यानंतर तेवतियाकडून त्याच्या ट्रेडमार्क स्टाईलची नक्कल !

एकाच षटकात ५ षटकार ठोकत फिरवला सामना

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामन्यात राजस्थान रॉयल्सने शारजाच्या मैदानात विक्रमाची नोंद केली. आयपीएलच्या इतिहासातली सर्वोच्च धावसंख्येचा राजस्थानने यशस्वी पाठलाग केला. २२४ धावसंख्येचा पाठलाग करताना एका क्षणाला राजस्थानने स्मिथ, सॅमसन, उथप्पा अशा महत्वाच्या फलंदाजांना गमावलं होतं. परंतू राहुल तेवतियाने संयम राखत शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर ५ षटकार खेचत सामन्याचं चित्रच पालटलं.

यानंतर ४ गडी राखून राजस्थानने सामना जिंकला. ड्रेसिंग रुममध्ये आल्यानंतर सेलिब्रेशनदरम्यान तेवतियाने शेल्डन कोट्रेलच्या ट्रेडमार्क सेलिब्रेशन स्टाईलची नक्कल करत आपला आनंद साजरा केला.

 

View this post on Instagram

 

Straight from the dressing room, into your hearts. – Reactions post THAT chase. #RRvKXIP #HallaBol #IPL2020

A post shared by Rajasthan Royals (@rajasthanroyals) on

तेवतियाव्यतिरीक्त संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनीही राजस्थाकडून आश्वासक खेळी केली. पंजाबच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत यॉर्कर चेंडू न टाकल्याचा त्यांना फारमोठा फटका बसला. सोशल मीडियावरही दिवसभर क्रिकेटप्रेमी आणि माजी खेळाडू तेवतियाच्या खेळीचं कौतुक करत आहेत.

अवश्य वाचा – IPL 2020 : तेवतियाच्या ५ षटकारांनी फिरला सामना, गेलच्या विक्रमाशी बरोबरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 5:33 pm

Web Title: ipl 2020 rahul tewatia imitates sheldon cottrells salute after rrs win over kxip psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 MI vs RCB Dream 11 Team Prediction : या खेळाडूंना द्या टीममध्ये जागा, होईल फायदा
2 “मला कोणी सांगू शकेल का?, हा सॅमसन नावाचा गृहस्थ नक्की…”; आनंद महिंद्रांनाही पडला प्रश्न
3 IPL 2020 : मुंबईविरुद्ध सामन्यात RCB ख्रिस मॉरिसशिवाय मैदानात उतरणार !
Just Now!
X