दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यात बंगळुरुने १० धावांनी बाजी मारली. युजवेंद्र चहलने एकाच षटकात बेअरस्टो आणि विजय शंकर यांना माघारी धाडलं आणि सामन्याचं पारडं एका क्षणात RCB च्या दिशेने झुकलं. यानंतर हैदराबादचा मधल्या फळीतला एकही फलंदाज बंगळुरुच्या माऱ्यासमोर तग धरु शकला नाही. विजयासाठी अवघ्या ३० धावांची गरज असताना मैदानात एक अपघात घडला ज्याचा फटका पुन्हा एकदा हैदराबादलाच बसला.

अवश्य वाचा – Video : फॅन्सी शॉट खेळायला गेलेला प्रियम गर्ग फसला, हेल्मेटला लागून बॉल थेट स्टम्पवर

शिवम दुबेच्या गोलंदाजीवर युवा खेळाडू अभिषेक शर्माने एक फटका खेळला. यावेळी नॉन स्ट्राईक एंडवर उभ्या असलेल्या राशिद खानने एक धाव पूर्ण केली. मात्र दुसरी धाव घेण्यासाठी परत येत असताना दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ दिसला नाही. धाव पूर्ण करण्याच्या नादात दोन्ही फलंदाजांची जोरात टक्कर झाली आणि ज्यात अभिषेकला आपली विकेट गमवावी लागली. पाहा हा व्हिडीओ…

बेअरस्टो आणि मनिष पांडे या जोडीने आश्वासक भागीदारी करत संघाला विजयपथावर आणून ठेवलं होतं. बेअरस्टोने फटकेबाजी करत अर्धशतकही झळकावलं. मात्र अखेरच्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीचा फटका हैदराबादला बसला.