News Flash

IPL 2020: धोनीबद्दल CSKच्या मालकांनी केली महत्त्वाची घोषणा, म्हणाले…

धोनीच्या क्रिकेटमधील भविष्याबाबत मांडलं मत

IPL 2020मध्ये चेन्नईच्या संघाची कामगिरी फारशी चांगली होऊ शकली नाही. १४ सामन्यांमध्ये केवळ ६ विजय मिळवत त्यांना सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. IPLच्या इतिहासात प्रथमच चेन्नईच्या संघाला पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्याचसोबत महेंद्रसिंग धोनीलादेखील पहिल्यांदाच संपूर्ण हंगामात एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. धोनीच्या या कामगिरीनंतर धोनी IPL मधूनही निवृत्त होणार का? असा प्रश्न उपस्थित होत असताना धोनीने त्यावर स्पष्टपणे उत्तर देत चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आता CSKचे मालक एन श्रीनिवासन यांनी धोनीसंदर्भात एक महत्ताची घोषणा केली आहे.

“धोनी आणि चेन्नई संघाचा यंदाचा हंगाम फारसा चांगला गेला नाही. मी म्हणेन की हे एक वाईट वर्ष होतं. धोनी संघाचा कर्णधार होता आणि तो यापुढेही संघाचं नेतृत्व करत राहील. धोनीने संघातील बदलाबाबत काही गोष्टी सामन्यानंतरच्या कार्यक्रमात सांगितल्या. त्या बोलण्यामागे त्याचा नक्की काय हेतू होता हे मला चांगलंच माहिती आहे. त्याने या सर्व गोष्टींबाबत माझ्याशी चर्चा केलेली आहे”, असे श्रीनिवासन यांनी मिररशी बोलताना स्पष्ट केलं.

“दहा यशस्वी वर्षांनंतर एखादं वाईट वर्ष आलं तर त्याने खचून जायचं नसतं. पुढल्या वर्षी आम्ही दमदार पुनरागमन करू याची मला खात्री आहे. ऋतुराजबद्दल बोलायचं तर तो करोनाच्या आजारातून थोडासा उशीरा सावरला. फाफ डु प्लेसिसने म्हटल्याप्रमाणे त्याच्यात तरूणपणी खेळणाऱ्या कोहलीची झलक दिसते. महत्त्वाची बाब म्हणजे भारताला बऱ्याच दिवसांनी इतका चांगला आणि गुणवान खेळाडू मिळाला आहे. ऋतुराज नक्कीच विराट कोहलीसारखा यशस्वी होईल”, असेही श्रीनिवासन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 3:21 pm

Web Title: ms dhoni big update csk owner srinivasan says msd will continue to be captain of side ruturaj gaikwad ipl 2020 vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : मुंबई इंडियन्सला आव्हान देण्याची ताकद दिल्ली कॅपिटल्समध्येच – संजय बांगर
2 IPL 2020 Playoff : काय आहेत दोन्ही संघांसमोरची आव्हानं??
3 IPL 2020 : अंतिम फेरीसाठीची झुंज!
Just Now!
X