Dream 11 IPL 2020: गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात आणि लगेचच दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभव अशी स्पर्धेची संमिश्र प्रकारची सुरूवात चेन्नई सुपर किंग्ज संघाची झाली. तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी दिली. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या दोघांनी दिल्लीला दमदार सलामी मिळवून दिली. पण त्याला अर्धशतकानंतर पृथ्वी शॉ बाद झाला.

पृथ्वी शॉ ची विकेट हा सामन्यातील चर्चेचा विषय ठरला. याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा वयाच्या चाळीशीत असलेल्या धोनीचं चपळ स्टंपिंग… १३व्या षटकात पियुष चावला गोलंदाजी करत होता. त्यावेळी दुसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉ ने पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू त्याच्या पायाला लागला आणि धोनीच्या दिशेने गेला. पृथ्वी शॉ ला काही कळण्याआधीच धोनीने चपळाई दाखवत स्मार्ट स्टंपिंग केलं आणि पृथ्वीला माघारी धाडलं.

पृथ्वी शॉ ने ४३ चेंडूत ६४ धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत ९ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता.