27 February 2021

News Flash

IPL 2020: अरेरे… राजस्थानच्या नावे पराभवासोबतच लाजिरवाणा विक्रम

कोलकाताविरूद्धच्या पराभवानंतर राजस्थान स्पर्धेबाहेर

मोक्याच्या क्षणी बड्या फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक खेळामुळे राजस्थान रॉयल्सचे स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. स्पर्धेत आव्हान टिकवण्यासाठी राजस्थानच्या संघाला शेवटच्या साखळी सामन्यात विजय आवश्यक होता. पण कोलकाताच्या प्रभावी गोलंदाजीपुढे त्यांचा ६० धावांनी पराभव झाला. १९२ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ केवळ १३१ धावांच करू शकला. राजस्थानच्या संघाला १२ गुणांसह IPL 2020 च्या गुणतालिकेत शेवटचं स्थान मिळालं. आतापर्यंतच्या IPL कारकिर्दीत तळाच्या संघाला मिळालेले हे सर्वात जास्त गुण ठरले.

राजस्थानच्या संघाचा मानहानीकारक पराभव झाला. या पराभासोबतच त्यांच्या नावे एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. गुणतालिकेत पहिल्यांदा राजस्थानच्या संघाला तळाच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तसेच आधी IPL विजेता ठरलेला संघ तळाला राहण्याचंही हे पहिलंच वर्ष ठरलं.

सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी या फलंदाजांनी संयमी खेळ करत ७२ धावांची भागीदारी केली. तर कर्णधार मॉर्गनने शेवटच्या टप्प्यात ६८ धावांची फटकेबाज खेळी करत संघाला १९१ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने पॉवर-प्लेच्या षटकांमध्ये तब्बल ५ बळी गमावले. बेन स्टोक्स, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ आणि रियान पराग या महत्त्वाच्या फलंदाजांनी स्वस्तात तंबूचा रस्ता धरला. त्यानंतर राहुल तेवातियाने काही काळ संघर्ष केला, पण अखेर राजस्थानच्या संघाचा दणदणीत पराभव झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 4:52 pm

Web Title: rajasthan royals registers worst record in ipl history rr vs kkr vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : बेंगळूरु-दिल्ली लढतीत विजयी संघ द्वितीय स्थानी
2 IPL 2020 : KKR साठी प्ले-ऑफचा रस्ता खडतर, ‘या’ आहेत शक्यता
3 IPL 2020 : गुणतालिकेत KKR ची गरुडझेप, अखेरच्या स्थानावरुन थेट चौथ्या स्थानी झेप
Just Now!
X