मुंबईचा संघ प्ले-ऑफ्ससाठी पात्र ठरल्यानंतर पहिल्यांदाच मैदानावर उतरला. दिल्लीच्या संघाविरोधात कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर शिखर धवन आणि मुंबईकर पृथ्वी शॉ मैदानात आले. पृथ्वी शॉने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर एक धाव काढून फॉर्मात असलेल्या शिखर धवनला स्ट्राईक दिली. पण धवन दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला.

वेगवान गोलंदाज शिखर धवनने दुसऱ्या चेंडूवर गलीच्या दिशेने फटका मारला. चेंडू हवेत अत्यंत वेगाने गेला. चेंडू अपेक्षेपेक्षा थोडा कमी वेगात जात असल्याने गलीमध्ये फिल्डिंग करणाऱ्या सूर्यकुमारपासून चेंडू थोडा लांब होता. पण चेंडू जमिनीच्या दिशेने जात असताना सूर्यकुमारने झेप घेतली आणि झेल टिपला. झेल नीट पकडण्यात आला आहे की नाही याची मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांच्या मदतीने शहानिशा केली आणि धवनला बाद ठरवलं.

पाहा सूर्यकमारने टिपलेला झेल…

दरम्यान, मुंबईच्या संघाने दिल्लीविरूद्धच्या सामन्यासाठी हार्दिक पांड्याला विश्रांती देत फिरकीपटू जयंत यादवला संघात स्थान दिलं. तसंच जेम्स पॅटिन्सनच्या जागी नॅथन कुल्टरनाईलला संघात समाविष्ट करून घेतलं.