अपेंडिक्स’ला मराठीत आंत्रपुच्छ म्हणतात. हा आपला एक अवयव आहे. तसं पाहायला गेला तर एक निरुपयोगी, पण जंतुसंसर्ग झाला तर त्रासदायक असा हा अवयव आहे.

हे आंत्रपुच्छ (अपेंडिक्सच) आपल्या पोटात कुठं असतं?

uddhav thackeray pm narendra modi (8)
ठाकरे गटाच्या गाण्यातील ‘या’ शब्दांवर आयोगाचा आक्षेप; उद्धव ठाकरे म्हणतात, “…तोपर्यंत आमच्यावर कारवाई करता येणार नाही!”
Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..
narendra modi bill gates
Video: “आपण एआयशी स्पर्धा करायला हवी, त्याला सांगायला हवं की…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बिल गेट्स यांच्याशी AI वर संवाद!
How to make raw mango dal mango dal
तुम्ही कधी चटकदार कैरीची डाळ खाल्ली आहे का? नसेल तर ही घ्या सोपी रेसिपी

आपल्या सर्वाना हे माहीतच असेल की खाल्लेलं अन्न वाहून नेणारा मार्ग म्हणजे अन्ननलिका. जठर, लहान आतडं, पुढे मोठं आतडं हे सगळं एखाद्या नळीसारखं आहे, म्हणजे आतून पूर्ण पोकळी असलेलंज्यामधून खाल्लेलं व पचलेलं अन्न आपला मार्ग चालत असतं.

आपल्या पोटाच्या पोकळीत जिथे लहान आतडं संपून मोठय़ा आतडय़ाची सुरुवात होते, तिथे सुरुवातीला मोठय़ा आतडय़ाचा भाग एखाद्या फुगीर पिशवीसारखा असतो त्याला (Caecum) असं म्हणतात. आणि या पिशवीपासून शेपटीसारखं हे अपेंडिक्सच (आंत्रपुच्छ) निघतं. हे आंत्रपुच्छ आतून पोकळ असतं व त्याचं दुसरं पलीकडचं टोक बंद असतं. याच्या या प्रकारच्या ठेवणीतच अपेंडिसायटिसच्या दुखण्याचं कारण लपलेलं आहे. या पिशवीला जंतुसंसर्ग झाला की त्याला आपण अपेंडिसायटिस म्हणतो. ही पिशवी सूज येऊन फुटू शकते व हे इन्फेक्शन पूर्ण पोटात पसरू शकतं.

अपेंडिसायटिस का होतो ?

आतडय़ांतील अन्न काही कारणामुळे आपला सरळ रस्ता सोडून या अपेंडिक्सच्या फाटय़ात शिरतं. पुढे रस्ता नसल्याने अपेंडिक्सच्या आतच पडून राहतं व त्यात कुजण्याची प्रक्रिया होते. यामुळे जंतुसंसर्ग होऊन अपेंडिक्सला सूज येते व दुखणं सुरू होतं. (लहान मुलांमध्ये व वयस्कर माणसांत अपेंडिक्स झाल्यावर ते पोटात लवकर पसरू शकते.)

अपेंडिसायटिस (अपेंडिक्सचे दुखणे) होण्याची कारणं

) बद्धकोष्ठता (Constipation) – रोज शौचाला साफ न होणं. यामुळे मोठय़ा आतडय़ातील अन्न पुढं सरकायला थोडा जास्त वेळ घेतं. आतडय़ामध्ये खडे होणं.

) वरचेवर पावभाजी, पिझ्झा, तळलेले पदार्थ, नुसतंच नॉनव्हेज खाण्यामुळे अन्नातील तंतुमय पदार्थ फार कमी प्रमाणात पोटात जातातत्यामुळे आतडय़ातून अन्न पुढे सरकण्याची क्रिया हळू होते. हे अन्न सरळ रस्ता सोडून अपेंडिक्समध्ये शिरतं व अपेंडिसायटिस होऊ शकतो.

) अंथरुणाला खिळलेल्या (Bed ridden) व्यक्ती यांची शारीरिक हालचाल कमी असल्याने आतडय़ांची हालचालपण मंदावते व अन्न अपेंडिक्समध्ये शिरू शकतं.

) जंत (Worms) किंवा अपेंडिक्सच्या गाठीने अपेंडिसायटिस होऊ शकतो.

अपेंडिसायटिसची लक्षणे:

पोट दुखणं पोटात अतिशय व सारखं दुखत राहतं. पोटदुखीस सुरुवात पोटाच्या मध्यापासून होते व काही तासांनी ते दुखणं फक्त उजव्या बाजूने खालच्या बाजूला येऊन राहतं.

उलटय़ा होऊ लागतातउलटी ही पिवळ्या हिरव्या रंगाचीपण असू शकते.

ताप येतो.

शौचाला आल्यासारखं वाटतं, पण होत नाही.

) या वेळी लक्षात आलं नाही किंवा डॉक्टरकडून योग्य ट्रीटमेंट मिळाली नाही किंवा इन्फेक्शन फारच तीव्र असेल तर पोटात तीव्र वेदना होत राहतात.

) अपेंडिक्स कदाचित फुटूपण शकतं व तो पू पोटात पसरतो.

) केव्हा केव्हा अपेंडिक्सच्या भोवती आतल्या इन्फेक्शनचा पू बाहेर येऊन पोटात असणारी आवरणे (Peritoneum) त्याला गुंडाळतात व इन्फेक्शन पोटात पसरू देत नाहीत, काही दिवसांनी त्या ठिकाणी गोळा होतो.

अपेंडिसायटिस आहे असं वाटल्यास काय करावं?

ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी. पोटाच्या विशिष्ट ठिकाणी भरपूर दुखत असेल तर डॉक्टर रक्त तपासणी व सोनोग्राफीच्या साहाय्याने निदान करतात. क्वचित वेळी सीटीस्कॅनची गरज पडते.

तोंडाने काहीही देऊ नये, एनिमासुद्धा देऊ नये.

उलटय़ा होऊन अंगातील पाणी कमी झाल्यासारखं वाटल्यास किंचित घोट घोट पाणी किंवा ओआरएस (डफर) घ्यावं. याशिवाय काहीही देऊ नये.

रुग्णाला आधार देऊन स्वस्थ बसून ठेवावं.

अपेंडिसायटिसवरील उपाय

औषधी उपाय अपेंडिसायटिसचा आजार कमी प्रमाणात असेल तर औषध घेऊन हे बरं करता येतं. काही विशिष्ट अ‍ॅन्टिबायोटिक देऊन हे इन्फेक्शन आटोक्यात येतं. त्याचबरोबर दुखणं कमी करण्यासाठी औषधं दिली जातात.

ऑपरेशनअपेंडिक्स जास्त सुजल्यास किंवा बरे न झाल्यास ते काढून टाकायला लागतं.

ऑपरेशन दोन प्रकारे करता येतं.

पोटाला चीर देऊन, पोट उघडून नेहमीप्रमाणे.

लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे पोटाला भोक पाडून दुर्बीण आत टाकून ते काढून टाकता येतं. यामध्ये रुग्ण लवकर बरा होऊन कामाला जाऊ लागतो.

ऑपरेशनचे दुष्परिणाम कमी असतात, पण एखाद्या एक्स्पर्टकडूनच लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करून घ्यावी.

अपेंडिक्सचा गोळा झाला असेल तर काही दिवस (६ आठवडे) थांबून मगच ऑपरेशन करावं. त्याने धोका कमी असतो.

अपेंडिसायटिस होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

अपेंडिसायटिस पूर्णपणे टाळू शकत नाही. परंतु खालील सवयी पाळल्याने अपेंडिसायटिसचं प्रमाण कमी होतं.

आहार भरपूर पाणी प्यावं. आहारात तंतुमय चोथा (फायबर) असावा. म्हणजे पालेभाज्या, सलाड, कोशिंबीर या रोजच्या जेवणात असावीत. रोज फळं खावीत.

भाकरी, चपाती जेवणात जास्त घ्यावी. न सडलेल्या, पॉलिश न केलेल्या तांदळाचा भात घ्यावा. नॉनव्हेज खाणाऱ्यांनी त्याबरोबर सलाड, चपाती खाणं जरुरी आहे.

पावभाजी, पिझ्झा यांसारखे मैद्यापासून बनवलेले फास्टफूड जास्त खाऊ नये.