वैद्यकीय वगळता सर्वच विद्याशाखांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचा टक्का अजुनही कमी आहे. वैद्यकीयमध्येही केवळ नर्सिग, आयुर्वेद, होमिओपॅथीमुळे मुलींची संख्या फुगलेली दिसते. अन्यथा एमबीबीएस आणि बीडएसच्या मुख्य वैद्यकीय शाखांमध्ये मुलेच जास्त आहेत.
उच्च शिक्षण, २०१३च्या अहवालानुसार २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांत विविध विद्याशाखांमध्ये एकूण १ कोटी ३८लाख ९३हजार ४९१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यापैकी ५५.७ टक्के मुलगे आहेत. तर मुलींचे प्रमाण अवघे ४४.३ टक्के आहे. मुलांचे एकूण नोंदणीचे प्रमाण २०.७ टक्के तर मुलींमध्ये ते अवघे १७.९ टक्के इतके आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांचा इतर विद्यार्थ्यांच्या नोंदणीशी तुलना करता फारच निराशादायी चित्र पुढे येते. देशाची विद्यार्थी नोंदणीचे प्रमाण १९.४ इतके आहे. पण, अनुसूचित जातींमध्ये ते अवघे १३.४ इतके आहे. तर अनुसूचित जमातींमध्ये ते ११.२ इतके आहे. या समाजातील मुलींचे उच्चशिक्षणातील प्रमाण पाहता आणखीनच निराशादायी चित्र हाती येते.
सर्वात कमी खर्च महाराष्ट्राचा
महाराष्ट्रात उच्च शिक्षणावर ‘एकूण ढोबळ स्थानिय उत्पन्ना’च्या (ग्रॉस स्टेट डोमेस्टीक प्रोडक्ट-जीएसडीपी) अवघा ०.१४ टक्के इतका खर्च केला जातो. तामिळनाडू (१.५०), कर्नाटक(०.२१), बिहार(०.५५), आंध्र(०.८५), प.बंगाल(०.३१), मध्यप्रदेश(०.८५) या मोठय़ा राज्यांच्या खर्चापेक्षा हा सर्वात कमी आहे.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
faculty and non-teaching staff have not been paid since two months in Department of Higher Education in West Vidarbha
प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतनच नाही; तब्बल साडेपाच हजारांवर…
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या