News Flash

चवींचे शास्त्र

टी टेस्टिंग, वाईन टेक्नॉलॉजी, फळ प्रक्रिया, वनौषधी, साखर निर्मिती व प्रक्रिया असे विविध नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम विविध संस्थांमध्ये सुरू आहेत. या आगळ्यावेगळ्या प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी

| May 31, 2013 08:06 am

टी टेस्टिंग, वाईन टेक्नॉलॉजी, फळ प्रक्रिया, वनौषधी, साखर निर्मिती व प्रक्रिया असे विविध नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम विविध संस्थांमध्ये सुरू आहेत. या आगळ्यावेगळ्या प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती-

* बॅचलर ऑफ सायन्स इन टी हजबंडरी अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी :
आसाम कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या डिपार्टमेन्ट ऑफ टी अ‍ॅण्ड हजबंडरी या विभागाने बॅचलर ऑफ सायन्स इन टी हजबंडरी अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी हा नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केला आहे. चहा निर्मिती उद्योगाला लागणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त  ठरतो. या अभ्यासक्रमात टी हजबन्डरी, चहा प्रक्रिया अभियांत्रिकी, चहा व्यापारातील कायदेशीर बाजूंचा समावेश असलेले अर्थशास्त्र आणि सामान्य प्रशासन या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
पत्ता- कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चर,
जोरहट- ७८५०१३, आसाम. दूरध्वनी- ०३७६-२३४०००१.
वेबसाइट- www.aau.ac.in
* टी टेस्टिंग कोर्स :
दार्जिलिंग टी रिसर्च अ‍ॅण्ड मॅनेजमेन्ट या संस्थेने टी टेस्टिंग अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांला हा अभ्यासक्रम करता येतो. अभ्यासक्रमाची फी ३० हजार रुपये. विद्यार्थ्यांची निवड मुलाखतीद्वारे केली जाते.
सर्टिफिकेट प्रोग्रॅम ऑन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन इन टी :
चहाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी संगणकाचा उपयोग कसा करता येईल, हे या अभ्यासक्रमात शिकवले जाते.
अभ्यासक्रमाचा कालावधी- तीन महिने.
अर्हता- बारावी.
शुल्क- पाच हजार रुपये.
पत्ता- दार्जिलिंग टी रिसर्च
अ‍ॅण्ड मॅनेजमेन्ट असोसिएशन, शिवमंदिर, पोस्ट ऑफिसकद
मताल, सिलगुरी-७३४०११. दूरध्वनी- ०३५३-२५८१५८२.
वेबसाइट- www.nitm.com
*  बॅचलर ऑफ सायन्स इन वाइन टेक्नॉलॉजी :
या संस्थेने सुरू केलेल्या पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना पुणे विद्यापीठ आणि राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या संस्थेने बॅचलर ऑफ सायन्स इन वाइन टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.
कालावधी- तीन वर्षे.
अर्हता- विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण. एकूण ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
फी – दरवर्षी ४१ हजार रुपये. एकूण ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
पत्ता- प्लॉट नंबर- २९, त्रिमूर्ती चौकाजवळ,
बालविद्यामंदिर लेन, नाईक माळा, पाटील नगर सिडको,
नाशिक- ४२२००९, वेबसाइट- www.gargiedu.com

*  डिप्लोमा इन फ्रुट प्रोसेसिंग अ‍ॅण्ड वाइन टेक्नॉलॉजी :
अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे. प्रवेशजागा – ५०. प्रवेशासाठी ८० टक्के वेटेज बारावीच्या गुणांना आणि २० टक्के वेटेज हे मुलाखतीला दिले जाते.
*  वाइन अ‍ॅप्रिशिएशन कोर्स :
शनिवार- रविवारी शिकवल्या जाणाऱ्या या अभ्यासक्रमात देशविदेशातील वाइनचा दर्जा, गुणवत्ता, चव ओळखण्यासाठीचे ज्ञान या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दिले जाते. वाइन आणि आरोग्य, वाइनचा इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र, पांढरी- लाल- गोड आणि इतर प्रकारच्या वाइन निर्मितीची प्रक्रिया, खाद्यपदार्थासोबतच वाइनची चव घेण्याची पद्धत यासारख्या विषयांचा यात समावेश आहे. हा अभ्यासक्रम दोन पातळींवरील असून शुल्क प्रत्येकी तीन हजार रुपये आहे.
*  मास्टर ऑफ सायन्स इन वाइन टेक्नॉलॉजी :
या अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वष्रे. अर्हता- बीएस्सी इन केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, झुऑलॉजी, मायक्रोबायलॉजी, बॉटनी, अ‍ॅग्रिकल्चर, बीई किंवा बीटेक्. पत्ता-४७, गार्गी प्रधान पार्क, कृषी नगर कॉलेज रोड, नाशिक.
*  शेती संबंधित अभ्यासक्रम :
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लान्टेशन मॅनेजमेन्ट, डिप्लोमा ऑफ व्हॅल्यू अ‍ॅडेड प्रॉडक्टस् फ्रॉम सिरिअल्स, पल्सेस अ‍ॅण्ड ऑइलसीडस्, डिप्लोमा ऑफ व्हॅल्यू अ‍ॅडेड प्रॉडक्टस् फ्रॉम फ्रुटस् अ‍ॅण्ड व्हेजिटेबल्स, डिप्लोमा ऑफ फिश प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टििफकेट इन अ‍ॅग्रिकल्चरल पॉलिसी, सर्टिफिकेट इन ऑर्गेनिक फार्मिंग, सर्टिफिकेट इन वॉटर हार्वेस्टिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, सर्टिफिकेट इन पोल्ट्री फार्मिंग बीकिपिग, सर्टिफिकेट इन ऑन इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी पोटॅटो कल्टिवेशन.
संपर्क- स्कूल ऑफ अ‍ॅग्रिकल्चर, इंदिरा गांधी नॅशनल ओपन
युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली- ११००६८
वेबसाइट www.ignou.ac.in
ईमेल- s0a@ignou.ac.in

*  सर्टिफिकेट कोर्स इन मेडिसिनल प्लँट :
युनिव्हर्सिटी ऑफ मद्रासच्या इन्स्टिटय़ूट ऑफ डिस्टन्स एज्युकेशनने सुरू केलेले अभ्यासक्रम – सर्टिफिकेट कोर्स इन मेडिसिनल प्लान्ट, सर्टििफकेट प्लान्ट सेल अ‍ॅण्ड टिश्यू कल्चर अर्हता- बारावी उत्तीर्ण,
कालावधी- एक वर्ष.
अर्ज व माहितीसाठी पत्ता : डायरेक्टर, इन्स्टिटय़ूट ऑफ डिस्टन्स
एज्युकेशन, युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास. चेन्नई- ६००००५.
मेल – direcoride@ uncom.ac.in,
वेबसाइट : www.ideunom.ac.in

*  कृषी अभ्यासक्रम :
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग या संस्थेचे कृषी अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत –
१) प्लान्ट प्रोटेक्शन हा अभ्यासक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील बामनी या गावच्या मॉन्ट फोर्ट सिनिअर सेकंडरी स्कूल येथे उपलब्ध आहे.
२) प्रीझव्‍‌र्हेशन ऑफ फ्रुटस् अ‍ॅण्ड व्हेजिटेबल्स. हा अभ्यासक्रम मुंबई येथे वर्सोवा स्थित बेगम जमिला अब्दुल हक, कॉलेज ऑफ होम सायन्स, ६०, बावला कॉम्प्लेक्स, यारी रोड, वर्सोवा या ठिकाणी शिकवला जातो.
पत्ता- ए २४/२५, इन्स्टिटय़ूशनल
एरिया, सेक्टर-६२, नॉयडा, नॉयडा-२०१३०९, दूरध्वनी- ०२०४०८९८३५,
फॅक्स-४०८९८१९.
वेबसाइट- www.nios.ac.in,, ईमेल- lsc@nios.ac.in
हे अभ्यासक्रम कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतात. कालावधी सहा महिने ते दोन वर्षे.
विभागीय केंद्रांचा पत्ता- नॅशनल इन्स्टिटय़ूट ओपन स्कूल,
रिजनल सेंटर,व्दारा इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन, कोथरूड,
पुणे-४११०२९. दूरध्वनी-०२०-२५४४४६६७, २५४३९७६३.
ईमेल- cpune@nios.ac.in

*  साखर निर्मिती व प्रक्रिया :
वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट या संस्थेने साखर निर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामध्ये डिप्लोमा इन शुगर इंजिनीअरिंग, इन्डस्ट्रिअल फर्मन्टेशन अ‍ॅण्ड अल्कोहल टेक्नॉलॉजी सुगर इन्स्ट्रमेन्टेशन टेक्नॉलॉजी, शुगर टेक्नॉलॉजी या पदविका अभ्यासक्रमांचा
समावेश आहे.
प्रमाणपत्र अभ्यासक्रम :
* सर्टिफिकेट ऑपरेशन अ‍ॅण्ड मेन्टनन्स कोर्स
: अर्हता- बारावी उत्तीर्ण आणि साखर कारखान्यातील दोन वर्षांचा अनुभव असल्यास उत्तम.
अभ्यासक्रमाचा कालावधी- सहा महिने, प्रवेशजागा ३०.
* सर्टिफिकेट कोर्स इन ज्युस सुपरव्हिजन :
अर्हता- दहावी उत्तीर्ण आणि साखर कारखान्यातील दोन वर्षांचा अनुभव असल्यास उत्तम/ अभ्यासक्रमाचा
कालावधी- सहा महिने/ प्रवेशजागा ३०.
* सर्टिफिकेट इन शुगर बॉयिलग :
अर्हता- दहावी उत्तीर्ण.
अभ्यासक्रमाचा कालावधी- सहा महिने/ प्रवेशजागा ६०,
पत्ता-
मांजरी बुद्रुक- ४१२३०७, तालुका हवेली, जिल्हा पुणे दूरध्वनी०२०-
२६९०२१००/१७१. वेबसाइट- www.vsisugar.com.
ईमेल- registrar@vsisugar.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 8:06 am

Web Title: teasting science
Next Stories
1 पाठय़पुस्तकांतील चुका टाळण्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक कक्ष
2 विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी.
3 खासगी विद्यापीठे नियंत्रण मुक्त!
Just Now!
X