वस्तुनिष्ठ प्रश्नसंच- सामान्य विज्ञान
प्र. 1. धरणाच्या िभती तळाशी रुंद असतात कारण –
पर्याय :    1)    धरण खूप वर्षे टिकावे म्हणून.
    2)    धरणाचा दाब खोलीनुसार वाढतो.
    3)    त्यामुळे धरणास भक्कमपणा येतो.
    4)    यापकी नाही.
प्र. 2. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ)    शाई भरण्याच्या ड्रॉपरमध्ये शाई आत शिरते, कारण ड्रॉपरच्या वरच्या टोकाकडे कमी दाबाची निर्मिती झालेली असते.
ब)    दिव्यातील तेल वातीतून वर चढते, यावरून केशाकर्षण गुणधर्म दिसून येतो.
पर्याय :    1)    अ विधान बरोबर आहे.
    2) ब विधान बरोबर आहे.
    3)    अ व ब विधान बरोबर आहे.
    4) अ व ब विधान चूक आहे.
प्र. 3. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांनी तयार होते त्यांना काय म्हणतात?
पर्याय :    1) इलेक्ट्रॉन    2) प्रोटॉन
    3) पॉझ्रिटॉन    4) फोटॉन
प्र. 4. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ)    ग्रहांच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या नियमाला ‘केपलरचा गतीचा नियम’ म्हणतात.
ब)    बिनतारी संदेश यंत्रणेमध्ये वापरण्यात येणारा विजेचा प्रवाह हा डी. सी. प्रवाह असतो.
पर्याय :    1) अ विधान बरोबर आहे.
    2) ब विधान बरोबर आहे.
    3) अ व ब विधान बरोबर आहे.
    4) अ व ब विधान चूक आहे.
प्र. 5. नॅचरल गॅसमध्ये प्रामुख्याने ….. हा वायू असतो.
पर्याय :    1) ब्युटेन    2) मिथेन
    3) इथेन    4) प्रोपेन
प्र. 6. कार्बन मोनॉॅक्साईड व नायट्रोजन यांच्या मिश्रणास ….. म्हणतात.
पर्याय :    1) वॉटर गॅस    2) प्रोडय़ुसर गॅस
    3) कॉल गॅस    4) ऑइल गॅस
प्र. 7.    अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी …….. वापरतात.
पर्याय :    1) कॅडमियम    2) युरेनियम
    2) स्टील    4) अ‍ॅल्युमिनियम
प्र. 8.    खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
अ)    कोणत्याही वस्तूची सावली निर्माण होते, कारण प्रकाशकिरण सरळ रेषेत जातात.
ब)    प्रकाशकिरण प्रीझममधून जातात तेव्हा सर्वात जास्त विचलन जांभळ्या रंगाचे होते.
पर्याय :    1) अ विधान बरोबर आहे.
    2) ब विधान बरोबर आहे.
    3) अ व ब विधान बरोबर आहे.
    4) अ व ब विधान चूक आहे.
प्र. 9.    खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ)    जेव्हा पृथ्वी ही चंद्र व सूर्याच्या जवळ असते तेव्हा सूर्यग्रहण दिसते.
ब)    जेव्हा एखादा चुंबक आपटला तेव्हा त्याचे चुंबकीय गुणधर्म वाढतात.
पर्याय :    1) अ विधान बरोबर आहे.
    2)    ब विधान बरोबर आहे.
    3)    अ व ब विधान चूक आहे.
    4) अ व ब विधान बरोबर आहे.
(योग्य विधाने :  जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान असतो तेव्हा सूर्य ग्रहण दिसते आणि जेव्हा एखादा चुंबक आपटला तेव्हा त्याचे चुंबकीय गुणधर्म कमी होतात.)
प्रश्नांची उत्तरे : प्र. १- २, प्र. २- ३, प्र. ३- ४, प्र. ४- ३, प्र. ५- २, प्र. ६- २, प्र. ७- १, प्र. ८- ३, प्र. ९- ३.
(क्रमश:)