लोकप्रतिनिधीपदाची कवचकुंडले अंगावर बाळगून सरकारी कर्मचाऱ्यांवर हात उगारणारे आमदार बच्चू कडू हे काही पहिलेच नाहीत आणि ही व्यवस्था अशीच लेचीपेची राहिली तर शेवटचेही असणार नाहीत. मनगटशाही म्हणजेच पुरुषार्थ असे वाटण्यास खतपाणी घालणारे असे राजकारणी आसपास असतील तर अशा समाजात सभ्य असणे हे मागासलेपणाचेच समजले जाणार, यावर सडेतोड भूमिका मांडणाऱ्या ‘अगदीच बच्चू’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉगबेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे. या अग्रलेखात कायदा मोडणाऱ्यांचा जयजयकार करणाऱ्या समाजाच्या दुर्गुणावर टीका करण्यात आली आहे.
* मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत.
* https://loksatta.com/blogbenchers/ या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.
* किमान २५० शब्द व मराठीतील लेखनाचाच स्पर्धेसाठी विचार केला जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students to post opinion on bacchu kadu for loksatta blog benchers
First published on: 05-04-2016 at 00:56 IST