प्र. 1. खालीलपकी कोणते विधान चूक आहे?
1) भारतातील ग्रामपंचायतींची स्थापना हे घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांच्या पालनाचे उत्कृष्ट उदाहरण होय.
2) सुरुवातीस भारतीय राज्यघटना 395 कलमे किंवा अनुच्छेद होती व ती 22 भागात विभागली गेली होती.
पर्याय : अ) 1 विधान चूक 2 बरोबर आहे. ब) 2 विधान चूक 1 विधान बरोबर आहे.
क) 1 व 2 विधान चूक आहे.
ड) 1 व 2 विधान बरोबर आहे.
प्र. 2. भारतीय घटनेच्या संदर्भात खालील विधानांपकी कोणते विधान चुकीचे आहे?
1) भारतीय घटनेत संघराज्याची तसेच एकात्मिक राज्याची अशी दोहोंची वैशिष्टय़े उतरलेली आहेत.
2) आणीबाणीच्या काळात देशात राज्याचा प्रभाव व नियंत्रण अधिक व्यापक होत असल्याचे दिसून येते.
3) मध्यवर्ती शासन प्रबळ असलेली संघराज्यात्मक घटना अशा शब्दांतच भारतीय घटनेचे वर्णन करणे अधिक उचित होईल.
पर्याय : अ) 1 व 2 विधान चूक ब) 2 व 3 विधान चूक
क) 1 व 3 विधान चूक ड ) फक्त 2 चूक
प्र. 3. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
1) भारताच्या घटना समितीने घटनेचा मसुदा जनतेपुढे मतदानासाठी ठेवला होता.
2) भारताची घटना समिती प्रत्यक्षरीत्या जनतेकडून निवडली गेली नव्हती.
3) मान्यवर नेत्यांचा समावेश असलेल्या या समितीत समाजातील विविध स्तरांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला गेला होता.
पर्याय : अ) 1 व 2 विधान बरोबर ब) 2 व 3 विधान बरोबर
क) 1 व 3 विधान बरोबर ड) 1, 2, 3 विधान बरोबर भारताच्या घटना समितीने घटनेचा मसुदा जनतेपुढे मतदानासाठी ठेवला नव्हता.
प्र. 4. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
1) भारतीय घटनेचा अर्थ लावताना घटनेतील घटनेचा सरनामा हा भाग आधारभूत व महत्त्वाचा ठरतो.
2) आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताने कोणत्याही गटात सामील न होता तटस्थतेचे धोरण स्वीकारले आहे. ही बाब घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचे महत्त्व व शासनाने त्यांचा केलेला आदर दर्शवितात.
3) घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, कलम 14 (समतेचा हक्क) हे घटनेतील सर्वात महत्त्वाचे कलम होय.
पर्याय : अ) विधान 1 व 2 बरोबर आहे.
ब) विधान 1 व 3 बरोबर आहे.
क) विधान 1,2 व 3 बरोबर आहे.
ड) विधान 1, 2 व 3 चूक आहे.
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कलम 32 (घटनात्मक उपाययोजना होण्याचा हक्क) हे घटनेतील सर्वात महत्त्वाचे कलम होय.
प्र. 5. भारतीय घटनेतील विविध तरतुदींच्या संदर्भात खाली केलेल्या विधांनापकी कोणते विधान चुकीचे आहे?
पर्याय : अ) मूलभूत हक्कांवर गदा आल्यास भारतीय नागरिकांस त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते.
ब) एखाद्या नागरिकाने घटनेतील कलम 51 अ मध्ये दिलेल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन न केल्यास त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली नाही.
क) राज्याने वा केंद्राने घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास त्याविरूध्द न्यायालयात दाद मागता येते.
ड) आजच्या घटनात्मक तरतुदी लक्षात घेता मूलभूत हक्कांना मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा प्राधान्य देण्यात आलेले दिसून येते.
प्र. 6. खालीलपकी कोणते विधान चूक आहे?
1) आयकर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे.
2) निवडणूक आयोगाची निवड करण्यासाठी राष्ट्रपतींना अधिकार आहे.
3) शेती हा विषय परिशिष्ट सातमधील केंद्र सूचीत समाविष्ट केला आहे.
पर्याय : अ) 1 व 2 विधान चूक आहे.
ब) फक्त 1 विधान चूक आहे.
क) फक्त 3 विधान चूक आहे.
ड) सर्व चूक आहेत.
शेती हा विषय परिशिष्ट सात मधील राज्य सूचीत समाविष्ट केला आहे.
प्रश्नांची उत्तरे : प्र. १- ड, प्र. २- ब, प्र. ३- ब, प्र. ४- अ, प्र. ५- क, प्र. ६- क.
(क्रमश:)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc exam practice papers
First published on: 06-04-2013 at 09:05 IST