कोल्हापूर : येथील अ‍ॅड. अमित भालचंद्र बोरकर यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केली. सुमारे २५ वर्षांंहून अधिक काळ वकिली व्यवसायात असलेल्या बोरकर यांनी शिवाजी विद्यापीठाचे विधी सल्लागार म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे. बोरकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी शपथ दिली. मूळचे कोल्हापूर येथील असलेल्या बोरकर यांचे शनिवार ब्रँच शाळा, न्यू हायस्कूल, विवेकानंद महाविद्यालय व शहाजी विधी महाविद्यालय येथे उच्चशिक्षण झाले आहे. त्यांनी जुलै १९९४ ते मे १९९७ या कालावधीत कोल्हापूर जिल्हा, दिवाणी न्यायालयांसह अन्य प्राधिकरणांवर काम केले आहे. दिवाणी, घटनात्मक, सहकार, शिक्षण, व्यापार कायदे, शैक्षणिक, सेवा आदी विषयांतील खटल्याचे कामकाज त्यांनी पाहिले आहे. जून १९९७ पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रधान पीठासमोर ते काम करीत आहेत.

ED claim in court in Delhi liquor scam case that crime is impossible without Sisodian  participation
सिसोदियांच्या सहभागाशिवाय गुन्हा अशक्य! दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा
supreme-court_
मदरसा कायदा रद्द करण्यास अंतरिम स्थगिती; अलाहाबाद उच्च न्यायालयाने चुकीचा अर्थ लावला- सर्वोच्च न्यायालय
Amravati, Land Lease Scam, 348 Crore, Supreme Court, sent Notice, Divisional Commissioner, District Collector,
अमरावतीत ३४८ कोटींचा जमीन लीज घोटाळा : सर्वोच्च न्यायालयाची विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस
Dy Chandrachud on Tamil Nadu Governor
‘तुम्ही न्यायालयाचा अवमान करत आहात’, सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूच्या राज्यपालांना सुनावलं