कमालीची उत्सुकता ताणलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. कोल्हापूर महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरिता नंदकुमार मोरे विजयी झाल्या. त्यांनी भाजपा ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांचा ४१ विरूध्द ३३ मतांनी केला पराभव केला.

सत्तारूढ आणि विरोधकांनी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त चालवली होती. अखेरच्या क्षणापर्यंत शह काटशहचे राजकारण रंगले होते. विरोधी गटाचे नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील हा सामना लक्षवेधी बनला होता. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने आपला गड राखण्यात यश मिळवले.

What Sanajy Raut Said About Shrikant Shinde?
संजय राऊत श्रीकांत शिंदेंविरोधात आक्रमक, “बाळराजेंच्या ट्रस्टला कुठल्या दानशूर कर्णांनी कोट्यवधींच्या….”
Uddhav Thackeray Gave Answer to Narendra Modi
उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींच्या ‘नकली शिवसेने’च्या टीकेवर जोरदार उत्तर, “तुमच्या बरोबर जो चायनीज माल..”
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान
Heena Gavit nandurbar
नंदुरबार – धुळ्यात भाजप उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादीची नाराजी

दरम्यान, महापौर निवडी पाठोपाठ उपमहापौर निवडीतही सत्ताधाऱ्यांनी यश राखले. निवडीची प्रक्रिया दुपारी पावणेबाराच्या सुमारास सुरू झाली. उपमहापौरपदाच्या निवडीत काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी विरोधी गटाचे कमलाकर भोपळे यांचा पराभव केला. याहीवेळी महापौर निवडीचे संख्याबळ कायम होते.

सोमवारी सकाळी सत्ताधारी गटाचे सर्व ४१ नगरसेवक फेटे बांधून आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या समवेत महापालिकेत आले तेंव्हाच सत्ताधारी गटाचा महापौर होणार याची खुणगाठ बांधली गेली. सभा सुरू झाल्यावर त्याचा प्रत्यय आला. सरिता मोरे यांना ४१ तर जयश्री जाधव यांना ३३ मते मिळाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अपेक्षावर पुन्हा एकदा पाणी फिरले. मोरे यांच्या विजयानंतर एकच जल्लोष करण्यात आला.