कोल्हापूर : येथील डॉ. प्रकाश गुणे यांनी आज सेना दलासाठी एक कोटी रुपयांची मदत दिली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे आज त्यांनी मदतीचा धनादेश प्रदान केला.

कोल्हापुरातील डॉक्टर गुणे हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. वैद्यकीय व्यवसायामध्ये या कुटुंबातील चार पिढ्या सेवेत आहेत. मूळचे गडहीग्लज येथील डॉक्टर अनंत पुणे यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रथम प्रवेश केला. त्यानंतर त्यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश पुणे यांनी कोल्हापुरात निर्मल रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा सुरू केली. ते कोल्हापुरातील पहिले मूत्र विकार तज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचे पुत्र डॉक्टर राहूल व नातू आर्यन डॉक्टर यांनी हेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

buddha sculpture made of with one and a half inch chalk in kolhapur
मूर्ती लहान त्याची कीर्ती महान! कोल्हापूरात साकारले दीड इंच खडूमध्ये बुद्धांचे शिल्प
congress mla pn patil passes away marathi news
आमदार पी. एन. पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी; कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू , शासकीय इतमामात अंत्यविधी होणार
fashion show of transgender in Kolhapur won adulation riya Mayuri Alvekar Winner
कोल्हापुरातील तृतीयपंथीयांच्या ‘फॅशन शो’ने मिळवली वाहवा; रिया मयुरी आळवेकर विजेती
kolhapur girl honesty returned the money
प्रामाणिकपणाची अशी ही ‘सृष्टी’; कोल्हापुरातील नऊवर्षीय बालिकेने प्रामाणिकपणे परत केली पैसे, दागिन्याची पर्स
devotees , Mahalakshmi temple,
कोल्हापुरात महालक्ष्मी चरणी लाखभर भाविक
Hasan Mushrif, Kolhapur,
मुश्रीफ विदेशातूनही सक्रिय, रस्ते प्रकल्पप्रश्नी कोल्हापूर महापालिका आयुक्त आणि शहर अभियंत्याचे कान टोचले
Kolhapur, house Entry,
कोल्हापूर : विधवा-विधुरांच्या पाद्यपुजनाने गृहप्रवेश; सोनाळीतील सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे पुरोगामी पाऊल
Kolhapur Shiv Sena district chief Rajekhan Jamadar beat journalist
कोल्हापूर शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांच्याकडून पत्रकारास मारहाण


आज डॉक्टर प्रकाश व त्यांच्या पत्नी अनुराधा गुणे यांनी राजनाथ सिंग यांच्याकडे सेनादलाच्या मदतीसाठी एक कोटीचा धनादेश प्रदान केला. यापूर्वीही डॉक्टर गुणे यांनी विविध सामाजिक कार्यासाठी मोठी आर्थिक मदत केली आहे. मात्र हे काम करत असताना ते प्रसिद्धीपासून दूर राहिले आहेत. राजनाथ सिंग यांनी ट्विट केल्यानंतर त्यांनी केलेली माहिती लोकांना समजली. त्यावर समाज माध्यमात त्यांच्या या कार्याचे कार्याबद्दल कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले.