Hardik Pandya Swimming Pool Video : टीम इंडियाचा उपकर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या २०२४ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी स्वतःला ‘रिचार्ज’ करत आहे. आयपीएल २०२४ च्या कठीण हंगामानंतर, हार्दिक पंड्या शारीरिक आणि मानसिकरित्या ताजेतवाने होताना दिसत आहे. हार्दिक पंड्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्याचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करत असतो. हार्दिक पंड्याने त्याचा लेटेस्ट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

वास्तविक, हार्दिक पांड्या स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसला. हा अत्यंत मौल्यवान क्षण हार्दिक पंड्याने त्याच्या चाहत्यांशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केला आहे. हार्दिक पंड्याने पोस्ट शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘रिचार्जिंग.’ हार्दिक पंड्याच्या या पोस्टवर चाहतेही मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. हार्दिक पंड्या आता टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या तयारीत व्यस्त आहे. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पड्या टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.

Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Aggression
२ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Natasa Stankovic Comment on Hardik pandya Instagram post
हार्दिक-नताशाच्या घटस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, भाऊ कृणालच्या पोस्टवरील पंड्याच्या बायकोची कमेंट व्हायरल
Hardik Natasa not staying together said their friend
हार्दिक-नताशाच्या मित्राचे घटस्फोट प्रकरणावर मोठं वक्तव्य, म्हणाला, दोघेही अनेक महिन्यांपासून….
Who is Ali Khan Hero of USA Win he take 3 wickets in USA vs BAN 2nd T20I
अमेरिकेकडून सलग दुसऱ्यांदा बांगलादेशचा लाजिरवाणा पराभव, युएसएच्या विजयाचा हिरो अली खान आहे तरी कोण? जाणून घ्या
Ravichandran Ashwin Calls Sanju Samson Selfish After RR Captain Selected For T20 World Cup
“तो स्वार्थीपणे खेळतोय..”, अश्विनने संजु सॅमसनची विश्वचषकाच्या संघात निवड होताच केलं मोठं विधान; म्हणाला,”त्याची गरज..”
Hardik Pandya Natasa Stankovic Separation rumors
हार्दिक पंड्या – नताशा स्टॅनकोविक विभक्त होणार? इन्स्टाग्रामवर केला मोठा बदल, चर्चांना उधाण

हार्दिक पंड्या भारतीय संघाला देतो समतोल –

हार्दिक पंड्या आपल्या वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजीने भारतीय संघाला मजबूत संतुलन देतो. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या १३५-१४० किमी ताशी वेगाने गोलंदाजी करतो. टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये हार्दिक पंड्याची भूमिका आणखी मोठी होणार आहे. आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पंड्याची कामगिरी चांगली नसली, तरी निळ्या जर्सीमध्ये तो टीम इंडियासाठी काय करू शकतो हे सर्वांना माहीत आहे. भारतीय संघ ५ जूनपासून टी-२० विश्वचषक २० मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

हेही वाचा – T20 WC 2024 : ‘जसप्रीत बुमराह बर्फातही गोलंदाजी करू शकतो’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईची कामगिरी –

उल्लेखनीय आहे की आयपीएल २०२४ हंगामाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने रोहित शर्माला हटवून त्याच्या जागी हार्दिक पंड्याला नवा कर्णधार बनवले होते. आयपीएल २०२४ मध्ये, मुंबई इंडियन्स संघ १४ सामन्यांत केवळ ४ विजय आणि १० सामन्यांत पराभवासह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स हा सर्वात खराब संघ असल्याचे सिद्ध झाले. आयपीएल २०२४ मध्ये, मुंबई इंडियन्स एकसंघ होऊन चांगली कामगिरी करू शकला नाही. अशा प्रकारे मुंबई इंडियन्सला नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खास कामगिरी करता आली नाही.