News Flash

हसन मुश्रीफ यांची देवेंद्र फडणविसांवर टीका

 राज्यातील करोना स्थितीवरून सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये जुगलबंदी सुरू आहे.

कोल्हापूर : आपली तुलना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो; पण याचवेळी त्यांना नटय़ाचं कशा आठवतात, अशी विचारणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे केली.

राज्यातील करोना स्थितीवरून सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये जुगलबंदी सुरू आहे. याच मुद्यावरून रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यावर मुश्रीफ यांनी गोयल यांना राज्यात कोणीही ओळखत नाही. गोयल राज्याचे मंत्री असूनही केंद्राकडून कसलीही मदत आणत नाहीत, अशी टीका केली होती.

आज फडणवीस यांनी मुश्रीफ म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहेत की माधुरी दीक्षित, असा सवाल करून गोयल यांच्यावर केलेले टीकेचा निषेध नोंदवतानाच मुश्रीफ यांनाही कोल्हापूरच्या बाहेर कोणी ओळखत नाही, असा प्रहार केला.

मुश्रीफ म्हणाले, की करोनाची लागण वाढत असताना राजकारण न करता एकत्र मुकाबला करणे गरजेचे आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी नागपूर येथे कसलाही गाजावाजा न करता मोठी मदत केली आहे. गोयल मदत मिळवून देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका करीत असल्याने त्यावर बोललो असताना फडणवीस यांनी माझा उल्लेख करण्याची गरज नव्हती. करोना प्रतिबंधक लस महाराष्ट्राला मिळू नये. जेणेकरून जनता नाराज होऊन अराजक निर्माण होईल असा केंद्र शासनाचा डाव आहे. करोना झपाटय़ाने पसरत असताना मोदी-अमित शहा हे पश्चिम बंगालमध्ये जखमी महिलेला पराभव करण्यासाठी रात्रंदिवस तळ ठोकून आहेत, अशी टीका त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 12:06 am

Web Title: hasan mushrif criticizes devendra fadnavis zws 70
Next Stories
1 रेमडेसिविर, कृत्रिम प्राणवायू, खाटांचे कोल्हापुरात योग्य नियोजन – यड्रावकर
2 कोल्हापुरातील राजकीय संघर्षाचे लोण सोलापूर, सातारा जिल्ह्यात
3 परप्रांतीय कामगारांच्या स्थलांतरामुळे राज्यातील वस्त्रोद्योग अडचणीत
Just Now!
X