मिरजहून गणपतीपुळ्याकडे निघालेल्या एसटीच्या चालकास ह्दयविकाराचा झटका आल्याने ताबा सुटून सोमवारी झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला तर अन्य २४ जण गंभीर जखमी झाले. बाबूराव ज्ञानू सावंत (रा. मिरज) असे मृत चालकाचे नांव आहे. आवळी (ता. पन्हाळा) येथे हा अपघात घडला. जखमींवर पन्हाळा प्राथमिक आरोग्य केंद्र व सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मिरज स्थानकातून मिरज – गणपतीपुळे (एमएच -१०-३३६८) ही मिरज आगाराची सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सुटते. सकाळी ९.१५  वाजण्याच्या सुमारास ही बस कोल्हापूर बस स्थानकात येते. मात्र आज या एस.टीस अर्धा तास उशीर झाला. कोल्हापुरातून ९.४५ वाजता ही एस. टी. गणपतीपुळ्याकडे रवाना झाली. १०.४५ वाजण्याच्या सुमारास एस.टी आवळी (ता. पन्हाळा) येथे आली असता चालक बाबूराव सावंत यांच्या छातीमध्ये जोरदार वेदना होऊ लागल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यामुळे त्यांचा बसवरील ताबा सुटला व बस रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. यातच चालक सावंत यांना ह्दयविकाराचा जोरदार झटका आला. त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. गाडी झाडावर आदळल्याने एस.टीमधील ५० प्रवासी जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ जखमींना पन्हाळा , कोडोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. यापकी २४ जण गंभीर जखमी होते, त्यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
संजय वाघ, सुधीर कांबळे (वय ४४, रा. देवरुख), ताराबाई पाटील (वय ५०, रा,. सावळज), कल्पना माने (वय ५८, रा. सांगली), सुनंदा भगरे (वय ५३, रा. सांगली), सत्यजित  नारकर (वय २२, रा. सांगली), प्रवीण कांबळे (वय २८, रा. कागल), सुजीतकुमार पाटील (वय ३८, रा. कनाळ), शुभांगी िनबाळकर (वय ५८, रा. रत्नागिरी), प्रियांका मासाळ (वय २४, रा. मिरज), सुरेश िनबाळकर (वय ६०, रा. रत्नागिरी), राजकुमारी शेटे (वय १८, रा. पन्हाळा), रोहिणी बावसकर (वय ४५, रा.सांगली), अनंत बावसकर (वय ६०, रा. सांगली), अमित  जाधव (वय ३०, रा. सांगली), मालन जाधव (वय ५०, रा. सांगली), प्रभावती वडके (वय ७५, रा. कोल्हापूर), संजय वडके (वय ४५, रा. कोल्हापूर), विष्णू सुतार (वय ५८, रा. मालगाव), यशवंत माने (वय ६३, रा. मिरज), मंगल समुद्रे (वय ५४, रा.कोडोली), जयप्रकाश जाधव (वय ५०, रा. आजरा), भीमराव कांबळे (वय ४५, रा. आंबा), रामचंद्र देसाई (वय ४५, रा. सरोळे) अशी जखमींची नावे आहेत.