गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या वर्षीही प्रचंड गोंधळ झाला. सभेचे इतिवृत्त वाचन करण्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. तर सभाध्यक्ष, ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला असा आरोप केला. यामुळे निवडणुकीच्या आधी बुधवारी पार पडलेली ही शेवटची सभा सुद्धा वादग्रस्त ठरल्याचे दिसून आले.

राज्यातील सर्वात मोठा दूध संघ असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाची (गोकुळ) वार्षिक सभा गेली काही वर्ष सातत्याने वादग्रस्त होत चालली आहे. या वेळीही गोकुळ दूध संस्थेतील भ्रष्टाचार, गैरव्यवहारावरून जाब विचारणार विचारण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व गृहमंत्री सतेज पाटील यांनी केले होते. त्यानुसार दोघांच्या समर्थकांनी आज सभास्थळी मोठी उपस्थिती लावली.

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
BJP manifesto 2024 Sankalp Patra continuity amid change
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
Edwin Montagu
विश्लेषण: एका मिठाईवाल्याच्या विजयाने ब्रिटिश सरकार हादरले; १९२० सालची निवडणूक का ठरली महत्त्वाची?

प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. खबरदारीचा उपाय म्हणून खुच्र्या दोरखंडाने बांधून ठेवल्या होत्या.  सभा गुंडाळल्याने विरोधकांनी निषेधाच्या घोषणा सुरू ठेवल्या. सत्ताधाऱ्यांनी मंच सोडल्यावर गोंधळ आटोक्यात आला.