राज्यात सर्वाधिक ऊस गाळप करणारा कारखाना

सक्षम असणारे साखर कारखाने या ना त्या कारणांनी गटांगळ्या खात असल्याच्या काळात चक्क भंगारात विकण्याच्या योग्यतेचा कारखाना कोणी खरेदी केला तर तो वेडेपणा ठरावा, पण असा वेडेपणा  करत १०१६ टन  गाळप क्षमतेचा अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखाना खरेदी केला आणि हाच कारखाना आता  १२ हजार प्रतिदिन असे राज्यातील सर्वाधिक ऊस गाळप करतोय . तिहेरी आकडय़ात कित्येक वर्ष अडकलेल्या ऊस दराची कोंडी फोडत तो चार आकडय़ात नेऊन ठेवण्याची किमया करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची खरी किंमत किती असते याची प्रचिती देणारा कारखानाही हाच. हुपरी (ता. हातकणंगले) येथील माळावर उभ्या राहिलेल्या जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा हा यशस्वी इतिहास. हा कारखाना यंदा रौप्यमहोत्सवी वर्षांत प्रवेश करत आहे.

Nashik, Onion auction, Onion, Lasalgaon
नाशिक : लासलगाव बाजारात आठ दिवसांनंतर कांदा लिलाव पूर्ववत, सरासरी दीड हजार भाव
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी

सहकारातील राजकारण आणि राजकारणातील सहकार्य कसे असते याचा वस्तुपाठ म्हणून जवाहरच्या उभारणीकडे पाहता येईल. काळ १९८० सालचा. त्याकाळी प्रत्येक काँग्रेस आमदाराच्या मनात साखर कारखाना उभारणीचा विचार यायचा. तसाच तो तत्कालीन आमदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या मनी आला. साऱ्याच आमदारांमध्ये असलेली कारखाना उभारणीची घाई आणि दुसरीकडे २५ किमी अंतराच्या जोडीला तत्कालीन साखर कारखानदारांना स्पर्धक नको म्हणून होणारा विरोध या अडचणी होत्या. त्यामुळे केंद्रीय पातळीवर राजकीय शक्ती खर्च करूनही परवाना मिळण्याचा काहीच मार्ग निघत नव्हता. पुढे, १९८८ साली प्रकाश आवाडे हे आमदार बनले आणि शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले. याचवेळी उसाअभावी बंद पडलेल्या खासगी कारखान्याचे सहकारीकरण करून त्याचे पुनर्वसन करण्याचे धोरण संमत झाले. ही संधी साधत साकरवाडी येथील गोदावरी शुगर हा खासगी कारखाना खरेदी करण्याचा निर्णय कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी घेतला. अवघ्या सात महिन्यात त्याची उभारणी हुपरी येथे केली. पहिला गळीत हंगाम शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. आता याच पवारांच्या हस्ते २५ व्या गळीत हंगामाचा येत्या गुरुवारी प्रारंभ होत आहे

अन्य ठळक वैशिष्टय़े

ऊस दराच्या बाबतीत आघाडी, ऊस उत्पादन वाढीसाठी शेजाऱ्यांना मदत करणाऱ्या अनेक योजना, भाग विकासाच्या माध्यमातून परिसराचा विकास, सामूहिक शेतीचा ४५० एकरातील पहिला प्रयोग, कर्जाची वेळेवर परतफेड, बहुराज्य दर्जा, केंद्र-राज्य पातळीवरील असंख्य पुरस्कार अशी बरीचशी वैशिष्टय़े जवाहरमध्ये सामावली आहेत. आता हा कारखाना प्रतिदिन २० हजार टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून वाटचाल करत आहे.

भंगार हे आणि ते  

हल्ली साखर कारखानदारीत भक्कम उभे असणारे साखर कारखाने कवडीमोल किमतीत विकल्याच्या  प्रकारावरून गदारोळ उडाला असताना भंगार रूपात विकत घेतलेला जवाहर कारखाना राज्यातील सर्वाधिक गाळप करणारा आणि साखर उताऱ्याच्या तुलनेत सर्वाधिक दर  देणारा कारखाना बनला आहे, हे सहकारातील वैशिष्ठय़, वेगळेपण उठून दिसणारे आहे .

उसाची किंमत शेतकऱ्यांना उमगली

सन १९९० पूर्वी उसाचा दर  तीन आकडय़ात गुंतून पडला होता. पण १९९३-९४ या पहिल्याच हंगामासाठी अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवडे  यांनी प्रतिटन १००१ रुपये असा चार आकडय़ातील विक्रमी दर  घोषित केला आणि उपस्थित शेतकऱ्यांनीही डोईवरचे फेटे उडवत आनंद व्यक्त केला. देशात प्रथमच बॅक प्रेशर प्रणालीद्वारा राज्यातील पहिला सहवीज निर्मिती प्रकल्प सुरू केला. आता हा कारखाना १५ मेगॅवॉट वीज महावितरणला निर्यात करतो. हा कारखाना आता १२ हजार प्रतिदिन गाळप करण्यास सज्ज झाला असून सर्वाधिक गाळप करणाऱ्या कारखान्यात जवाहरचा क्रम वरचा आहे.