23 October 2020

News Flash

कोल्हापूर : संस्थात्मक विलगीकरण कक्षातील तरुणाकडून तरुणीचा विनयभंग

या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्याला अटक करुन स्वतंत्र पोलीस कोठडीत ठेवले आहे.

संग्रहित छायाचित्र

संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन) कक्षामध्ये राहणाऱ्या तरुणाने तिथेच क्वारंटाइन असलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याला स्वतंत्र पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तरुणीने आई-वडिलांसोबत सांगोला (जि. सोलापूर) ते इचलकरंजी (जि. कोल्हापूर) असा प्रवास केला आहे. आयजीएम हॉस्पिटल इचलकंरजी येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेवून ती इचलकरंजी येथील डीकेटीई गर्ल्स हायस्कूल येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल झाली.

आज सकाळी क्वारंटाइनमधील लोक आंघोळीला गेलेले असताना आरोपीने छप्पर नसलेल्या स्नानगृहाच्या भितींवर चढून संबंधित तरुणीकडे पाहून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. आरोपी तरुण याच इमारतीमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये राहतो. तरुणीने याबाबत फिर्याद दिली असून त्यानुसार तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 5:14 pm

Web Title: kolhapur a girl was molested by a youth in an institutional quarantine center aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 शेतकरी सन्मान दिन : राजू शेट्टींची सहकुटुंब बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मानवंदना
2 कोल्हापूरात आढळले सहा नवे करोना पॉझिटिव्ह; सर्वजण मुंबईहून आलेले प्रवासी
3 तूर्तास मुंबईहून कोल्हापूरकडे प्रवासी पाठवू नका; सतेज पाटील यांचं पोलीस महासंचालकांना पत्र
Just Now!
X