कोल्हापूर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील १५ संचालकांनी राजीनामे दिल्यानंतर आता या जागी जिल्ह्यातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची सोय लावण्यात आली आहे. मंगळवारी १३ अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली असून मुख्य प्रशासक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. तथा कृष्णराव परशराम पाटील यांची निवड करण्यात आली.

कोल्हापूर बाजार समितीतील कारभार वादग्रस्त बनला आहे. नोकरभरती, जागा भाडे व्यवहार बेकायदेशीर झाल्याने संचालकांनी राजीनामे दिले होते. गेल्या बुधवारी कोल्हापूर शहर उपनिबंधक प्रदीप मालगावे यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना कार्यभार सांभाळून आठवडा होण्यापूर्वीच बाजार समितीवर राज्य शासनाने अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती आज केली. अशासकीय प्रशासकीय मंडळाकडे कामकाज आल्यामुळे चौकशीचे बालंट आपोआप दूर होण्याची चिन्हे आहेत.

नवनियुक्त प्रशासक मंडळ – के. पी. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेश अध्यक्ष प्रा.जालंदर पाटील, बळीराम हरी पाटील, सचिन घोरपडे, करणसिंह गायकवाड, कल्याणराव निकम,सुर्यकांत पाटील, , राजेंद्र पाटील , दिगंबर पाटील , अजित बाबुराव पाटील, अजित पांडूरंग पाटील, सुजाता सावडकर, दगडू भास्कर