सोशल मिडीयाचा वापर लाचखोरी रोखण्यासाठी करण्यात येणार असून यासाठी अॅप सुरू करण्यात आले असून लवकरच सांगलीसाठी व्हॉटस अॅपचाही वापर लाचखोरी रोखण्यासाठी करण्यात येणार असल्याचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या वर्षभरात पुणे विभागात लाचखोराकडून सुमारे अडीच कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगलीत सांगितले. पुणे विभागात सर्वाधिक तक्रारी महसूल कर्मचाऱ्यांबाबत झाल्या असून लवकरच त्याखालोखाल पोलीस दलाबाबत तक्रारी आहेत. पुणे विभागात लाचखोरांना शिक्षेचे प्रमाण २७ टक्के असून सांगली जिल्ह्यात मात्र ते २० टक्के आहे. गेल्या वर्षभरात पुणे विभागात २१७ सापळे लावण्यात आले होते.
लाचखोरीत मिळविण्यात आलेली संपत्ती १६ कोटी ९१ लाख ९३ हजार रुपये असल्याची माहिती चौकशीत पुढे आली असून तक्रारदाराबाबत नाव गुप्त ठेवण्यात येत असल्याने तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. सोशल मिडीयाचा वापर करण्याचा यशस्वी प्रयोग लाचलुचपत विभागाने यंदापासून सुरू केला असून यासाठी स्वतंत्र अॅप विकसित केले आहे. यापुढे व्हॉट्सअॅपही सुरू करण्यात येणार असून यासाठी लवकरच मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात येणार आहे. या क्रमांकावर तक्रारदारांना तक्रारी करता येऊ शकेल असेही त्यांनी सांगितले.