22 September 2020

News Flash

शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार होणार : शिवसेनेची भूमिका

नामविस्ताराच्या प्रस्तावाला कोल्हापूरचे खासदार व शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे व इतर लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दर्शवला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकभावनेचा आदर करत ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्ताराचा प्रस्ताव कुलपती यांच्यासमोर ठेवला आहे. शिवाजी विद्यापीठाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार होणारच, अशी भूमिका शिवसेना शहर शाखेने शुक्रवारी स्पष्ट केली.

नामविस्ताराच्या प्रस्तावाला कोल्हापूरचे खासदार व शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे व इतर लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना शिवस्मरण हृदयाशी कवटाळून लढणारी एक लढवय्यी संघटना आहे. त्यामुळे या नामविस्तारात काथ्याकुट करणाऱ्या ज्येष्ठांनीही लोकभावनेचा आदर ठेवून काम करावे. शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार होणारच. शहरातील तालीम संस्था,मंडळे यांच्याकडून सहकार्याची अपेक्षाही या वेळी व्यक्त करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 12:55 am

Web Title: shivaji university to be renamed shivsena abn 97
Next Stories
1 नृसिंहवाडीत दत्त दर्शनासाठी लाखो भाविकांची उपस्थिती
2 कोल्हापूर विभागीय अंतिम फेरीसाठी पाच एकांकिका
3 वास्तवाला भिडणारे सादरीकरण 
Just Now!
X