फुटबॉल सामन्यांवेळी सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने पोलीस प्रशासनाने यंदाच्या फुटबॉल हंगामासाठी अटी व शर्थी घालण्याचा निर्णय घेऊन मगच स्पर्धा सुरु करण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे.  पोलिस प्रशासनाकडून संमती मिळाल्याने रखडलेला यंदाचा फुटबॉल हंगाम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र फुटबॉल सामन्यांवेळी काही भांडण अथवा वादविवादाचे प्रसंग घडल्यास संघ व्यवस्थापकांना जबाबदार धरुन कायदेशीर कारवाई करणार असल्याची अट पोलिसांनी घातल्याने संयोजकांची कसोटी लागणार आहे.
गत फुटबॉल हंगामा दरम्यान पाटाकडील तालीम व दिलबहार तालीम यांच्यात राडा झाला होता. यानंतर पोलिसांनी फुटबॉल सामन्यांवर बंदी घातली होती. यामुळे गत हंगामात काही स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. यंदा डिसेंबर महिना संपत आला तरी पोलिसांनी फुटबॉल हंगामास परवानगी न दिल्याने दोनच दिवसांपूर्वी कोल्हापूर फूटबॉल असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी नूतन जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप देशपांडे यांची भेट घेतली होती. यानंतर पोलिसांनी १५ अटी घालून फुटबॉल हंगामास परवानगी दिली
अशा असतील अटी
– भांडण, तंटा, राडा झाल्यास संघ व्यवस्थापक राहणार जबाबदार
– पूर्ण मदानाचे चित्रीकरण होणारे सीसीटीव्ही बसवणे
–  त्रयस्थ पंच नेमणे
– दोनही संघात समन्वयक नेमणे
– गुन्हे दाखल असणाऱ्या खेळाडूंना वर्तणुकीचा दाखला आवश्यक