News Flash

कोल्हापूर : राम मंदिर भूमिपूजनानिमित्त करवीर निवासिनी महालक्ष्मीचे मंदिरही सजले

दिवसभर विशेष पुजाविधींचे आयोजन

कोल्हापूर : राम मंदिर भूमीपूजनानिमित्त करवीर निवासिनी महालक्ष्मीचे मंदिरही सजले आहे. दिवसभर येथे पुजाविधी होणार आहेत.

अयोध्येत आज (दि.५) राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात आज विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मंदिराची खास सजावट करण्यात आली असून मंदिर रंगीबेरंगी प्रकाशाने उजळून गेले आहे.

संपूर्ण दिवस मंदिर सजावट, देवतांची विशेष पूजा, जप, अनुष्ठान, मंत्रपठण, रामरक्षा स्तोत्र, हनुमान स्तोत्र पठणाने हा दिवस साजरा करताना फिजिकल डिस्टंसिंग तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व निर्देशांचे आवर्जून पालन केले जाणार आहे. आज महालक्ष्मीची विशेष रत्नजडीत अलंकारिक खडीपुजा बांधण्यात येणार आहे, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 10:47 am

Web Title: the temple of mahalakshmi is also decorated on the occasion of ram mandir bhumipujan aau 85
Next Stories
1 कोल्हापूर: राम मंदिर भूमिपूजनानिमित्त स्थानिक कार्यक्रमाला पोलिसांचा मज्जाव; हिंदुत्ववादी संघटनांमध्ये नाराजी
2 दुधाच्या प्रश्नावर स्थानिक राजकारणाला उकळी
3 साखरेचा ‘राखीव साठा’ योजना रद्द
Just Now!
X