कोल्हापूर मध्ये सलग दुसऱ्या दिवशी करोनाचे तीन रुग्ण आढळून आले. मुंबईहुन आलेल्या एका महिलेसह दोन मुलांचे स्वब अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे सूत्रांनी रात्री सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यातील करोना स्थिती नियंत्रणात होती. काल, मंगळवारी दुपारी चंदगड तालुक्यातील तीन रुग्णांनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आज रात्री आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे. कोल्हापूर  येथिल सीपीआर करोना रुग्णालयात दहा करोनाग्रस्तावर उपचार सुरू आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी करोना पॉझिटिव आले आहेत. यात एक तीस वर्षीय महिला व अकरा वर्षाचा मुलगा व पाच वर्षाची मुलगी यांचा समावेश आहे. तिघांनीही सांताक्रूझ (मुंबई) हून कोल्हापुरात प्रवास केला आहे.  दोन दिवसापूर्वी त्यांचा प्रवास झाला असून दोन दिवसांपूर्वीच त्यांचा स्वॅप घेण्यात आला होता त्याचा पॉझिटिव्ह असा अहवाल काही वेळापूर्वी प्राप्त झाला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली.