पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आर्टिका मोटारीची रोड रोलरला धडक बसून झालेल्या अपघातात हातकांणगले तालुक्यातील दोन जण ठार झाले तर चार जण गंभीर झाले. हे सर्वजण लग्न, समारंभ विषयक क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. मुंबई येथील एका प्रदर्शन पाहण्यासाठी आर्टिका मोटारीतून सहा जण मुंबईला गेले होते. हेही वाचा >>> कोल्हापूर: तुरबत नासधूस प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी पन्हाळा बंदला प्रतिसाद; पर्यटन थंडावले शनिवारी ते किणी टोल नाक्याच्या दिशेने येत असताना घुणकी येथे आर्टिका मोटारीने रस्त्याकडे लावलेल्या रोड रोलरला जोरदार धडक दिली. त्यामुळे रोड रोलर रस्ता कडेला जाऊन पलटी झाला. मोटारीचा चक्काचूर झाला. राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू असल्याने आपला झाल्यानंतर अन्य वाहनांना जाण्यासाठी साईट असताना असल्याने वाहतूक दीर्घकाळ कोळंबली होती अपघातात सुयोग पाटील, सुनील कुरणे, वैभव चौगुले (सर्व रा. टोप) ,अनिकेत जाधव, राहुल शिखरे, निखिल शिखरे ( रा. मिणचे),रोलर चालक दादासाहेब दबडे यांनाही रुग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये सुयोग दत्तात्रय पवार ( २८, रा. टोप) व राहुल अशोक शिखरे ( ३०, मिणचे) यांच्या मृत्यू झाला आहे.