कोल्हापूर : भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्यावतीने विकास सेवा संस्थांच्या संगणकीकरणाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानिमित्त दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमितजी शहा यांच्या उपस्थितीत शनिवारी दि. २४ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला जाणाऱ्या संस्था प्रतिनिधींना केडीसीसी बँकेने विमानाची सफरीची व्यवस्था केली आहे. सबंध जिल्हाभरातील ३२ शेतकरी संस्था प्रतिनिधींना बँकेच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
याबाबत अधिक माहिती अशी, विकास सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाचा प्रकल्प वेगवान गतीने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १८७९ पैकी १७५१ विकास सेवा संस्थांच्या संगणकीकरणाचे कामकाज गतीने चालू आहे. दरम्यान; याआधी संगणकीकरण पूर्ण झालेल्या ३२ विकास सेवा संस्थांच्या सेवा संस्थांना दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे.
आणखी वाचा-कोल्हापूर : गोकुळने दूध खरेदी दर पूर्ववत करावेत; सीमावासीय शेतकरी, एकीकरण युवा समितीची मागणी
मंत्री मुश्रीफही दिल्लीला!
विकास सेवा संस्थांच्या संगणकीकरणामध्ये केडीसीसी बँकेचे काम उल्लेखनीय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश विकास संस्थांचे संगणकीकरण पूर्ण होत आले आहे. या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष, पालकमंत्री हसन मुश्रीफही या कार्यक्रमासाठी दिल्लीला रवाना होणार आहे. तसेच,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे हेही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
यांची हवाई यात्रा
हातकणंगले: श्री. गणेश -घुणकी, राजवर्धन मोहिते. शेतकरी -चावरे, दिलीप महाडिक. निलेवाडी -निलेवाडी, सुभाष भापकर. श्री भाग्यलक्ष्मी- नरंदे, प्रवीणकुमार भंडारी. छत्रपती शिवाजी- हेरले, उदय चौगुले.
पन्हाळा: विनयरावजी कोरे- वेखंडवाडी, अनिल कंदुरकर. श्री. केदारलिंग -आसुर्ले, पृथ्वीराज सरनोबत. विनयरावजी कोरे -आरळे, भरत घाटगे. विनयरावजी कोरे -जाखले, इंद्रजीत जाधव. श्री यशवंत -सातवे, संजय दळवी. श्री जुगाईदेवी -बाजार भोगाव, नितीन हिर्डेकर.
राधानगरी: श्री. खंडोबा -गवशी, सर्जेराव पाटील. तुळजाभवानी- घुडेवाडी, बंडोपंत किरुळकर. वीरभद्र -कांबळवाडी, जयदीप पाटील. शिवशंभू- करंजफेण, सदाशिव पाटील. दादासाहेब पाटील- बर्गेवाडी, रामचंद्र बर्गे. भैरवनाथ -पिरळ, दिनकर चौगुले.
गगनबावडा: श्री. खंबय्या रामेश्वर- मणदूर, परशुराम गोरुले.
गडहिंग्लज: बसवेश्वर -हिडदुग्गी, संजय तोडकर. कै. मारुती डावरे -पारदेवाडी, नामदेव कुपटे.
भुदरगड: यमाईबाई- कोनवडे, पंढरीनाथ पाटील. मराठा -गारगोटी, अजित देसाई. भीम -मुदाळ, शांताप्पा पाटील. ज्योतिर्लिंग -भेंडवडे, वसंत पाटील. कृष्णा -मुदाळ, संजय पाटील.
करवीर: गजानन -पाडळी खुर्द, सुरेशराव सूर्यवंशी. चाळकोबा- कोगे, बाजीराव पाटील. दत्त -कसबा बीड, सर्जेराव तीबिले. ज्ञानेश्वर- शिये, जयसिंग पाटील. हर हर महादेव- सावर्डे दुमाला, कुंडलिक पाटील. नागनाथ- नागदेववाडी, तानाजी निगडे.