कोल्हापूर: कृषी निविष्ठा दुकान सुरू करण्यासाठी लाच मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्याला मंगळवारी कोल्हापुरात रंगेहात पकडण्यात आले. सुनील जगन्नाथ जाधव, (वय ५०, पद – सद्या रा. इंद्रजित कॉलनी,कोल्हापूर, मुळ रा.शाहूपुरी सातारा) या अधिकाऱ्याचे नाव आहे.तक्रारदार हे जैविक शेती तसेच सेंद्रिय शेती करण्याबाबत शेतकरी लोकांना मार्गदर्शन करत असतात. शेतकऱ्यांना लागणारे खत,बी बियाणे आणि कीटकनाशके यांची विक्री करण्याकरिता तक्रारदार यांना स्व:ताचे दुकान चालू करावयाचे होते.
त्याकरीता आवश्यक असलेला परवाना मिळण्याकरिता तक्रारदार यांनी कृषी कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज केला होता. अर्ज मंजूर करून पुढील कार्यवाही करून वरिष्ठांच्याकडे पाठविणेसाठी सुनील जगन्नाथ जाधव यांनी तक्रारदार यांचेकडे प्रथम १० हजाररुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ९हजार रुपयांची लाच मागणी करून केली. ही लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. सुनील जगन्नाथ जाधव यांच्या यांचेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे,असे पर्यवेक्षण अधिकारी, सरदार नाळे,पोलीस उप अधीक्षक यांनी सांगितले.