कोल्हापूर : आपल्या प्रभागातील कार्यक्षेत्रात का आलास असा जाब विचारल्याच्या कारणावरुन इचलकरंजीतील दोन माजी पाणी पुरवठा सभापतींच्यामध्ये सोमवारी जोरदार शाब्दिक वादावादी झाली. यामध्ये काही नेतेमंडळींनी यामध्ये मध्यस्थी करत वादावर पडदा पाडला असल्याचे समजते.याबाबत समजलेली माहिती अशी, शांतीनगर परिसरातील जाधव मळा, लाखेनगर भागात अनेक दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने भागातील महिलांनी गावभागातील एका माजी पाणी पुरवठा सभापतीची भेट घेऊन समस्या सांगितल्या. त्यानंतर त्या माजी सभापतीने जाधवमळा-लाखेनगर परिसरात येऊन तेथील समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली.    

हेही वाचा >>> रत्नागिरी हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग भूमीसंपादनास कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा विरोध ; जशास तसे उत्तर राजू शेट्टींचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याची कुणकूण लागताच याच भागातील दुसरा माजी पाणी पुरवठा सभापती त्याठिकाणी आला. त्याने थेट गावभागातील त्या माजी सभापतीला ‘ तू येथे का आलास, हा भाग माझा आहे. मी तेथील समस्या बघतो , अशी विचारणा केली. त्यावर, समस्या सुटत नसल्याने  नागरिक माझ्याकडे आले आहेत. समस्या सोडविण्यासाठीच मी आलो असल्याचे प्रत्युत्तर दिले. शब्दाला शब्द वाढत गेला. त्यातूनच जोरदार वाद झडला. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तर गस्तीसाठी जाणारे गावभाग पोलिस गर्दी पाहून थांबले. त्या दोघांना ठाण्यात बोलविण्यात आले. त्याठिकाणी आलेल्या काही नेतेमंडळींनी दोघांची समजूत काढत वादावर पडदा टाकल्याचे समजते. या वादाची शहरात जोरदार चर्चा रंगली होती.